News Flash

सनी लिओनीची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

सनीच्या अमेरिकेतील बंगल्याची किंमत ३०कोटींहून अधिक आहे

पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सनी लिओनीला यंदाचे वर्ष खऱ्या अर्थाने महत्वाचे ठरले आहे. गेल्या काही काळापासून सनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहे. त्यातच तिच्या जीवनावर आधारित ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सनीचा जीवनप्रवास सर्वांसमोर आला. तिचा जीवनप्रवास पाहून तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली. हिच सर्वांची लाडकी सनी कोट्यावधींची मालकीण आहे.

सनीने करिअरच्या सुरुवातीला अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम करत अनेकांच्या मनात घर केले. त्यानंतर सनी भारतात आली. तिने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिम्स २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातून सनीने अनेकांच्या मनावर जादू केली आणि ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली. सनीने आतापर्यंत सतराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

‘टाइम्स नाऊ न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार सनी ९७ कोटींची मालकीण आहे. याशिवाय तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. मुंबईमधील सनीच्या बंगल्याची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे आणि अमेरिकेतील बंगल्याची किंमत ३०कोटींहून अधिक असल्याचे म्हटले जात आहे.

२०११मध्ये सनी डॅनिअल वेबरसह लग्न बंधनात अडकली. त्यांची पहिली ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. काही वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१७मध्ये त्यांनी निशाला दत्तक घेतले आणि २०१८मध्ये सरोगसीने त्यांना दोन जुळी मुले झाली. अनेक वेळा सनी तिच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

काही दिवसांपूर्वीच सनीने भारताच्या गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त वेळा सर्च होणाऱ्या व्यक्तींच्या यादीमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे. इतकेच नाही तर यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील मागे टाकले आहे. सध्या सनी मल्याळम चित्रपट ‘रंगीला’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तसेच या चित्रपटातून सनी मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानंतर ती ‘कोका कोला’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती महेंद्र धारीवाला करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 8:56 am

Web Title: sunny leone total property avb 95
Next Stories
1 सारा म्हणते, करीना माझी मैत्रीण आहे पण..
2 राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी पाटील व अमोल कागणे फिल्म्सचा धडाकेबाज ‘वाजवुया बँड बाजा’
3 अदनान सामीचं पाकिस्तानी ट्रोलर्सना सणसणीत उत्तर
Just Now!
X