News Flash

सनी लिओनीच्या ‘मस्तीजादे’चे पोस्टर प्रदर्शीत

सनी लिओनी 'मस्तीजादे' चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सनी लिओनी

माजी पॉर्नस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ‘मस्तीजादे’ चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा प्रौढ-विनोदीपट असेल. बऱ्याच काळापासून हा चित्रपट चर्चेत असून, सनी लिओनीने चित्रपटाचे मोशन पोस्टर आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केले आहे. चित्रपटात सनी लिओनी बरोबर तुषार कपुर आणि वीर दास प्रमुख भुमिका साकारताना दिसतील. मिलाप झवेरी दिग्दर्शीत या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही महिन्यांपुर्वी प्रदर्शीत करण्यात आले होते.

 

सनी लिओनीने ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो द्वारे भारतीय मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. महेश भट दिग्दर्शीत ‘जीस्म-२’ हा तीचा बॉलिवूडमधील पदार्पणातील पहिला चित्रपट, त्यानंतर ‘जॅकपॉट’, ‘रागिनी एम.एम.एस. २’, ‘एक पहेली लिला’, आणि ‘कुछ कुछ लोचा हैं’ या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनय चुणूक दाखवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:58 pm

Web Title: sunny leone tusshar kapoors mastizaade poster is out
Next Stories
1 राणी मुखर्जीच्या घरी ‘नन्ही परी’, नाव ठेवले ‘अधिरा’
2 ऊर्मिला कानेटकर वेगळ्या भूमिकेत
3 ‘अभिनयाने आयुष्य जगायला शिकवले’
Just Now!
X