26 January 2021

News Flash

Photo: ‘रोडीज’ फेम रणविजय सनी लिओनीच्या जुळ्या मुलांच्या भेटीला

रणविजयने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.

रणविजय सिंघा

‘रोडीज’, ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला’ यांसारख्या रिअॅलिटी शोमधून रणविजय सिंघाला एक नवीन ओळख मिळाली. यामध्ये त्याने अभिनेत्री सनी लिओनीसोबतही काम केलं आणि त्यादरम्यान दोघांची चांगली मैत्रीही जमली. रणविजय आणि सनीच्या मैत्रीचे किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. रणविजयने नुकतीच सनीच्या जुळ्या मुलांची भेट घेतली आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

रणविजयने त्याच्या दोन्ही हातांवर सनीच्या बाळांना घेतलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशर आणि नोह हे त्याच्या हातावर शांत झोपल्याचं या फोटोत दिसून येत आहे.

Video: ‘रिंगा रिंगा रोजेस’मध्ये रमल्या धोनी, रैना आणि हरभजनच्या मुली

निशा व्यतिरिक्त सनी आणि डॅनियलला दोन जुळी मुलंही आहेत. सनीने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. मार्चमध्ये सनीने याबाबतची घोषणा केली होती. इन्स्टाग्रामवर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर करत ‘आता माझं कुटुंब पूर्ण झालं’ असं तिनं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2018 7:34 pm

Web Title: sunny leone twins meet roadies host rannvijay singh see pic
Next Stories
1 ‘बाहुबली’च्या चाहत्यांसाठी प्रभासचा खास संदेश
2 भन्साळींसोबत काम करण्यास पुन्हा एकदा ‘मस्तानी’ सज्ज?
3 #30YearsOfAamir : …म्हणून आमिर त्याच्या चित्रपटांसाठी मानधन आकारत नाही
Just Now!
X