24 January 2021

News Flash

सनीने साजरा केला मुलांचा पहिला वाढदिवस, निशाबद्दल म्हणते…

सनीने तिच्या मुलांचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला

पॉर्नस्टार म्हणून करिअरची सुरुवात करणारी सनी लिओनी आता बॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी स्थिकावली आहे. छोट्या पडद्यावरील बिग बॉस या शोच्या माध्यमातून सनीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. बॉलीवूडला आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारी ही अभिनेत्री आता तीन मुलांची आई झाली असून तिने नुकताच तिच्या मुलांचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दसनीने शेअर केलेल्या व्हिडिओला एक साजेशी कॅप्शनही दिली आहे. या कॅप्शनमध्ये तिने आवर्जुन तिच्या लेकीचा निशाचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘आयुष्यातील प्रत्येक क्षण कुटुंबियांसोबत व्यतीत करणं हाच माझ्या जीवनाचा खरा मंत्र आहे. निशाच्या येण्यामुळे आमच्या आयुष्याला अर्थ मिळाला. तर नोहा आणि अशहच्या आगमनामुळे आमचं कुटुंब पूर्ण झालं. निशासुद्धा लहान आहे. मात्र तरीदेखील ती नोहा आणि अशहची छान काळजी घेते. निशा त्यांची बेस्ट सिस्टर आहे, असं सनीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या व्हिडिओमध्ये सनी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसून येत आहे. यात सनीने तिच्या दोन्ही मुलांसाठी खास दोन केक आणल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच सनी आणि डॅनियलने निशासोबत मिळून हा केक कापला.

दरम्यान, कुटुंबासोबत व्यस्त असलेली सनी लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. सनी एका मल्याळम चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यु करत आहे. या चित्रपटाबरोबरच ती दाक्षिणात्य सुपरस्टार माम्मुटीसोबत देखील स्क्रीन शेअर करणार आहे. ‘मधुरा राजा’ या आगामी चित्रपटात ती झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर तिचा ‘रंगीला’ या मल्याळम चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 1:28 pm

Web Title: sunny leone video with husband daniel weber birthday celebration
Next Stories
1 #BadlaTrailer : ‘पिंक’नंतर पुन्हा एकदा तापसीला वाचवणार बिग बी, पहा रहस्यमयी ट्रेलर
2 हिमांशूसोबत ब्रेकअपनंतर नेहाची प्रसारमाध्यमांना विनंती
3 संगीताच्या दुनियेतला बादशहा चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण
Just Now!
X