News Flash

अमिताभ बच्चन, विराट कोहलीच्या पंगतीत सनी लिओनी

नवी दिल्ली येथे असणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता बी- टाऊनच्या बेबी डॉलचा म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

सनी लिओनी

नवी दिल्ली येथे असणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता बी- टाऊनच्या बेबी डॉलचा म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे सनी खऱ्या अर्थाने बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि विराट कोहली यांच्या पंगतीत जाऊन बसली असं म्हणायला हरकत नाही. खुद्द सनीच्याच हस्ते मंगळवारी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

अनावरण सोहळ्याच्या वेळी सनीने पुतळ्या शेजारी उभं राहून काही फोटो काढले. त्यावेळी त्यातील सनी कोण आणि पुतळा कोण, हे ओळखणंही कठीण झालं होतं.

आपला हा पुतळा पाहून सनीचा आनंदही तिच्या चेहऱ्यावरुन झळकत होता. पुतळा पाहून आपण पुरते भारावून गेल्याचंही ती म्हणाली. पुतळा साकारण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कलाकारांची आणि त्यांच्या कलेचंही तिने तोंड भरुन कौतुक केलं. त्यासोबतच या संग्रहालयात पुतळा साकारण्यासाठी आपल्या नावाची निवड करण्यात आल्याविषयी तिने संग्रहालयाचेही आभार मानले असून, ही सन्मानाची बाब असल्याचं स्पष्ट केलं.

फक्त सनी नव्हे तर, तिचा पती डॅनिअलही यामुळे फारच आनंदात असल्याचं पाहायला मिळत आहे. डॅनिअलने सोशल मीडियावर सनीचे आणि त्या मेणाच्या पुतळ्याचे फोटो पोस्ट केल्याचंही पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 6:15 pm

Web Title: sunny leone wax statue unveiled at delhi madame tussauds
Next Stories
1 गणपतीसाठी महेश काळेंची स्वरसाधना
2 Bigg Boss 12 : श्रीसंतमुळे पहिला टास्क रद्द; शो सोडून जाण्याची दिली धमकी
3 भजन गातो म्हणून मी काही साधू-संत नाही- अनुप जलोटा
Just Now!
X