News Flash

संजय दत्तसाठी सनी लिओनीने केला नागिन डान्स

‘नायक नहीं, खलनायक हूं मैं’ या गाण्यावर सनीने नागिन डान्स केला

सनी लिओनी

संजय दत्तचा बहुचर्चित ‘भूमी’ सिनेमात सनी लिओनी एक आयटम साँग करताना दिसणार आहे. ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ असे या गाण्याचे नाव आहे. संजयचा हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या या सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी सनीने अनोखी पद्धत वापरली आहे. संजयच्या ‘खलनायक’ सिनेमातील गाण्यावर सनीने चक्क नागीन डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

‘टॉयलेट- एक प्रेम कथा’साठी अक्षय- रणवीरने केला ‘चीप डान्स’

संजयच्या ‘नायक नहीं, खलनायक हूं मैं’ या गाण्यावर सनी चक्क नागिन डान्स करत आहे. संजयला त्याच्या सिनेमासाठी सनीसारख्या अनोख्या शुभेच्छा कोणीच दिल्या नसतील. सनीचेही या सिनेमात एक आयटम साँग आहे. या गाण्याशी निगडीत काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये सनी नखशिखांत दागिन्यांमध्ये मढलेली दिसते.

एका मुलाखतीत ओमंग म्हणाला की, ‘सिनेमात हे गाणं एका महत्त्वाच्या क्षणी येतं. त्यामुळे गाण्यासाठी सनीच असावी असं मला नेहमी वाटत होतं. मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे.’ ओमंग कुमारच्या या सिनेमातून संजय दत्त अनेक वर्षांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाचा ट्रेलर पाहून सिनेमाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असेल यात काही शंका येणार नाही. अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सूडकथा पडद्यावर पाहायला मिळेल, असं अडीच मिनिटांचा ट्रेलर पाहिल्यावर कळतं. बापलेकीच्या नात्याचा एक वेगळा पैलू सिनेमात उलगडेल.

आमीर खानच्या ‘पीके’ सिनमात संजय दत्तने लहानशी व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी चाहत्यांना संजय दत्तला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. २२ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 6:52 pm

Web Title: sunny leone wishes sanjay dutt for his upcoming movie bhoomi with special nagin dance
Next Stories
1 PHOTO : प्रिती आणि ऐश्वर्याच्या मैत्रीचा असा अंदाज पाहिलात का?
2 ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’साठी अक्षय- रणवीरने केला ‘चीप डान्स’
3 ‘बोस डेड ऑर अलाइव्ह’
Just Now!
X