‘गली बॉय’ चित्रपटातील कलाकार सिद्धार्थ चतुर्वेदीने मंगळवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. त्यानंतर दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ चतुर्वेदी दोघेही ट्रेंडिगमध्ये आले. दीपिका आणि सिद्धार्थ शकुन बात्राच्या आगामी चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाने नाव अद्याप निश्चित झालेले नाही. अनन्या पांडे सुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
दाऊदनंतर बिलावल भुत्तोंसोबत नाव जोडल्याने खवळली अभिनेत्री, कोण आहे मेहविश हयात?
दिपिका मंगळवारी या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अलिबागमध्ये आली होती. सिद्धार्थ आणि दिपिका या फोटोमध्ये एकत्र शांतपणे समोर पाहताना दिसत आहेत. दोघांनी पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान केला होता. सिद्धार्थने दिपिकासोबतचे फोटो पोस्ट करुन त्याला ‘सनसेट लव्हर्स’ असे कॅप्शन दिले. तो फोटो पोस्ट केल्यानंतर सिद्धार्थचं कमेंट सेक्शन हार्टच्या इमोजीनी भरुन गेला होता.
View this post on Instagram
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटामध्ये दिपिका आणि सिद्धार्थ एकत्र काम करत आहेत. त्याचदिवशी मंगळवारी दिपिकाचा नवरा अभिनेता रणवीर सिंह तिला सोडण्यासाठी गेट वे ऑफ इंडियावर आला होता. दिपिका याआधी ‘छपाक’ सिनेमामध्ये दिसली होती. झोया अख्तरच्या गली बॉय चित्रपटातील एमसी शेर या व्यक्तीरेखेने सिद्धार्थ चतुर्वेदीला ओळख मिळवून दिली. २०१६ साली आलेल्या इनसाइड एज वेब सीरिजमधून त्याने पदार्पण केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2020 4:28 pm