News Flash

कोरिओग्राफर गीताने केले लग्न? व्हायरल झालेला फोटो पाहून म्हणाली..

गीताने यावर वक्तव्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये गीताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो पाहून गीताने लग्न केले असे म्हटले जात होते. पण आता गीताने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

नुकतीच गीताने ‘आजतक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो विषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने उत्तर देत, ‘मी लग्न केलेले नाही. जर लग्न केले असते तर लपूनछपून लग्न केले नसते’ असे म्हटले. तसेच गीताच्या आईचे एक महिन्यापूर्वी निधन झाल्यामुळे ती लग्नाचा कोणाताही विचार करत नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील बबीताचे होते ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर प्रेम

 

View this post on Instagram

 

A post shared by Geetakapur (@geeta_kapurofficial)

पुढे ती म्हणाली, ‘मी सर्वांना सांगू इच्छिते की माझे लग्न झालेले नाही. खरंतर सुपर डान्सर चॅप्टर ४च्या आगामी भागामध्ये आम्ही बॉलिवूड क्वीन स्पेशल भाग शूट करत होतो. म्हणून मी माझ्या आवडत्या अभिनेत्री रेखा यांना एक छोटीशी भेट दिली आहे. जर माझे लग्न झाले तर मी अजिबात लपवणार नाही. इतक्या आनंदाची गोष्ट मी सर्वांसोबत शेअर करेन.’

गीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये गीताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या फोटोमध्ये गीता खूपच सुंदर दिसत होती. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे गीताने लावलेल्या सिंदूरने वेधले होते. गीता कपूरने अद्याप लग्न केलेले नाही हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आता सगळ्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की गीता मॉं ने गपचूप लग्न तर केले नाहीना? पण आता गीताने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 11:14 am

Web Title: super dance 4 judge geeta kapoor on wedding rumours says it false avb 95
Next Stories
1 ‘रणबीर, करिश्मा आणि करीना घराणेशाहीमुळे नाही तर…’, रिद्धिमा कपूरचा खुलासा
2 हुश्श! ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 ‘लग्न’ जास्त महत्वाचं ना की ‘समारंभ’, सोनाली कुलकर्णीच्या निर्णयाचं कौतुक
Just Now!
X