News Flash

गीता मॉं ने गपचुप केलं लग्न? सिंदूर लावलेला फोटो केला शेअर

हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

(Photo Credit : Geeta Kapur Instagram)

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर सगळ्यांची गीता मॉं म्हणून ओळखली जाते. गीता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गीता चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता एका पोस्टमुळे गीता मॉं चर्चेत आली आहे. गीताची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

गीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गीताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये गीता खूपच सुंदर दिसत आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे गीताने लावलेल्या सिंदूरने वेधले आहे. गीता कपूरने लग्न केलं नाही हे सगळ्यांना माहित आहे. तर आता सगळ्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की गीता मॉं ने गपचूप लग्न केलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Geetakapur (@geeta_kapurofficial)

एवढंच नाही तर अनेकांना कमेंट करतं गीताला तिच्या सिंदूर आणि लग्ना विषयी विचारलं आहे. एक नेटकरी म्हणाला, “मॉं ने सिंदूर लावला… मॉं चे लग्न कधी झाले?” दुसरा नेटकरी म्हणाला, “मॉं ने कोणाच्या नावाचा सिंदूर लावला आहे?” तिसरा नेटकरी म्हणाला, सिंदूर लावला? अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी गीता मॉं ला तिच्या लग्ना विषयी प्रश्न विचारले आहेत.

आणखी वाचा : करीनाच्या दुसऱ्या मुलाला सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त महत्व दिले जाते- आदर्श गौरव

दरम्यान, गीता मॉं ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ ची परिक्षक आहे. यामुळे आता सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष हे ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या येणाऱ्या एपिसोडवर आहे. गीता आता पर्यंत अनेक डान्स रिअॅलिटी शोची परिक्षक होती. तर, फरहा खान ही गीता कपूरची डान्स गुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 9:34 am

Web Title: super dancer 4 judge geeta kapur dons sindoor in latest photos sparks wedding rumours dcp 98
Next Stories
1 करोनामुळे काम मिळतं नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो – हिमानी शिवपुरी
2 ‘या’ कारणामुळे मिलिंद सोमणचा प्लाझ्मा घेण्यास डॉक्टरांचा नकार; निराश मिलिंदची पोस्ट व्हायरल
3 सोनू सूद म्हणतो बेड दिला, स्थानिक प्रशासन म्हणतं आम्हाला काहीच कल्पना नाही!
Just Now!
X