News Flash

‘सुपर डान्सर ४’ मधील कुणाल आणि हृतिकने केला या गोष्टीचा सामना

हा व्हिडीओ पाहून तुम्ही भावूक व्हाल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी डान्स शो म्हणजे ‘सुपर डान्सर.’ यंदा या डान्स शोचे ४ थे पर्व सुरू आहे. या शोमध्ये देशाच्या प्रत्येक भागातून लहान-लहान मुलं त्यांच्यातील दडलेला एक डान्सर सगळ्यांना दाखवण्यासाठी समोर येताना दिसतात. या डान्स रिअॅलिटी शो मध्ये आलेल्या प्रत्येक लहान मुलाची एक कहाणी असते. कोणाला आई-वडील साथ देत नाही, कोणावर आर्थिक संकट असून एक उत्तम डान्सर कसा होई शकतो हे पाहायला मिळतं. अशीच एक कहानी या एका स्पर्धकाची आहे. या शो मधील एका स्पर्धकात आणि बॉलिवूडचा हॅन्डसम हल्क हृतिक रोशनमध्ये एक साम्य आहे. हे सांगताना शोचे परिक्षक भावूक झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. कुणाल असे या स्पर्धकाचे नाव आहे. कुणाल आणि त्याच्या आई-वडीलांनी कुणालच्या बोबडा बोलण्याचा त्याच्या शिक्षणावर कसा परिणाम होत हे सांगितले. एवढंच नव्हे तर कुणालने त्याच्या आई-वडीलांना, “शाळेत सगळे माझी खिल्ली उडवतात म्हणून मी या पुढे शाळेत जाणार नाही,” असे देखील सांगितले होते. त्याची ही कहाणी ऐकूण परिक्षक भावूक झाले. तर, सगळ्यांची लाडकी परिक्षक गीता माँने त्याचा उत्साह वाढवण्यासाठी सांगितले की, “तुला हृतिक रोशनचा डान्स आवडतो का, तो एवढा चांगला डान्सर आहे, पण तुला माहित आहे का की लहान असताना हृतिक सुद्धा बोबडा बोलायचा, हा काही कोणता आजार नाही, त्यासाठी फक्त मेहनत करावी लागते,” असे सांगितले.

यंदाच्य वर्षी करोनाचे संसर्गामुळे याचे ऑडिशन्सहे ऑनलाइन झाले. ‘सुपर डान्सर’मध्ये फक्त ४ ते १४ वयोगटातील मुले भाग घेऊ शकतात. तर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, कोरिओग्राफर गीता मॉं आणि दिग्दर्शक अनुराग बासू हे या शोचे परिक्षक आहेत. अभिनेता रित्वीक धंन्जानी हा या शोचे सुत्रसंचालन करतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 7:26 pm

Web Title: super dancer chapter 4 contestant kunals struggle has something in common with hrithik roshan and it will make you very emotional dcp 98
Next Stories
1 ये है माधुरी की खुबसुरती का राज! माधुरीने सांगितला आपला फिटनेस मंत्र…
2 हॉलिवूडमधील समलिंगी अभिनेत्यांना वाटते ‘ही’ भीती! टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विंसलेटने केला खुलासा
3 “माझ्यातलं टॅलेंट अजून नीट समोरच आलेलं नाही”- श्रेयस तळपदे
Just Now!
X