महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या स्पर्धकांमध्ये ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ होण्यासाठी चांगलीच चुरस रंगली आहे. या सगळ्याच स्पर्धकांमध्ये नृत्यकौशल्याबरोबरच अजूनही काही कौशल्य आहेत ज्यामुळे हे एकमेकांपेक्षा वेगळे ठरत आहेत. यांचं हेच वेगळेपण परीक्षकांसोबतच प्रेक्षकांना ही भावत आहे. आपल्या नावाला साजेसं असंच वेगळेपण जपणाऱ्या जिज्ञासाला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ९ वर्षांची जिज्ञासा परीक्षकांनाही कोड्यात पाडेल असे प्रश्न सतत विचारत असते.

अवघ्या ३ वर्षात नृत्याला सुरूवात करणारी मुंबईची जिज्ञासा भोई तिचे गुरू प्रशांत दळवी यांच्यासोबत स्पर्धेत सहभागी झाली आहे. ती मंचावर आली की आज जिज्ञासा कोणत्या गाण्यावर परफॉर्म करणार यापेक्षा आज जिज्ञासा मंचावर येऊन कोणते प्रश्न विचारणार आणि आपण त्याला काय उत्तर देणार याचा विचार परीक्षक करत असतात. जिज्ञासा मंचावर येताना तगडी प्रश्नावली घेऊन येते ज्याने परीक्षकांच्याही नाकीनऊ येतं. त्यामुळे जिज्ञासाला आता ‘अनपेक्षित जिज्ञासा’ हे नाव आपसूक पडलंय आणि हे परीक्षकांनादेखील पटलंय. जिज्ञासा प्रभू देवा यांच्या आगामी ‘लक्ष्मी’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”
pankaja munde manoj jarange
“मला खात्री आहे, ती माणसं…”, प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य; मनोज जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

मुंबईची जिज्ञासा आपल्या अनपेक्षित प्रश्नांनी परीक्षकांना पेचात पाडत आहे तर आपल्या नृत्यकौशल्याने त्यांच्याकडून कौतुकाची थापदेखील मिळवत आहे. सुपर डान्सर महाराष्ट्र या मनोरंजनाच्या कार्यक्रमात लवकरच एका विशेष थीमच्या माध्यमातून विशेष नृत्य पाहायला मिळणार आहे आणि ती खास थीम म्हणजे ‘महाराष्ट्राचे लोकनृत्य’. ही खास थीम असलेल्या विशेष भागात गायक आनंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.