News Flash

सुपर स्लीम सोनाक्षी!

धिप्पाड शरीरयष्टी असूनही झिरोसाइजच्या अभिनेत्रींना तिने टक्कर देत बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.

| July 11, 2014 03:20 am

दबंग चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी. धिप्पाड शरीरयष्टी असूनही झिरोसाइजच्या अभिनेत्रींना तिने टक्कर देत बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. आताच्या क्षणी ती बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, आपली पूर्वीची प्रतिमा पुसण्यात सोनाक्षी सध्या व्यस्त आहे. रोज जीम, योगा, व्यायाम आणि डाइट करून सोनाक्षी तिच्या शरीरयष्टीवर विशेष लक्ष्य देत आहे. सध्या तिची स्लीम रुपातली छायाचित्रेही सोशल मिडियावर पाहावयास मिळत आहेत.

सोनाक्षीचा हा नवा सुपर स्लीम अवतार यो यो हनी सिंगच्या आगामी म्युझिक व्हिडिओ ‘सुपरस्टार’मध्येही पाहावयास मिळणार आहे. तिने या अल्बमधील आपला फर्स्ट लूक लॉन्च केला आहे. काळ्या रंगाची शॉर्ट पॅड, जॅकेट, टोपी आणि पेन्सिल हिल्समधला सोनाक्षीचा हा लूक नक्कीच तिच्या चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दबंग कलाकार सोनाक्षीचा हा लूक हॉलीवूड अभिनेत्री-गायिका जेनिफर लोपेझपासून प्रेरित असल्याचे म्हटले जातेयं. लेदर जॅकेट, क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट हे जेनिफरचे स्टायल स्टेटमेन्ट आहे. हनी सिंगच्या या नव्या अल्बमचा व्हिडिओ १० मिनिटांचा असून, याचे चित्रीकरण कॅलिफोर्नियातील वाळवंट आणि समुद्रकिनारी भागात करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2014 3:20 am

Web Title: super slim sonakshi sinha is super hot in superstar
Next Stories
1 स्वरा भास्करच वजन वाढतय!
2 ‘बिग बॉस ८’मध्ये दिसू शकतात हे चेहरे
3 टि्वटर, फेसबुक वापरणाऱयांना कामधंदा असतो की नाही – सलमानला प्रश्न
Just Now!
X