News Flash

मी आणि राजेश खन्ना कधीच विभक्त झालो नव्हतो- डिंपल कपाडिया

या प्रकरणाला आता एक वेगळच वळण मिळालं आहे

राजेश खन्ना, डिंपल कपाडिया

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता राजेश खन्ना यांच्या आशिर्वाद बंगल्याची सुवानणी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. पण, आता मात्र या सर्व प्रकरणाला एक वेगळच वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, अभिनेत्री आणि राजेश खन्ना यांची पत्नी डिंपल कपाडिया यांनी आपण आणि राजेश खन्ना कधीच विभक्त झालो नव्हतो असं वक्तव्य केलं आहे. आम्हा दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध होते असं डिंपल यांचं म्हणणं आहे. दरम्यान, यावर आता न्यायालयातर्फे पुढील निर्णय काय येतो हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. ९ ऑगस्टला या प्रकरणाची पुढील सुनावणी करण्यात येणार आहे.

राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर खासगी आयुष्याविषयी असणारी ही गुंतागुंत आणखीनच वाढत आहे. कारण, न्यायालयाकडे असणाऱ्या प्रतिज्ञापत्रात राजेश खन्ना यांच्या पत्नीच्या म्हणजेच डिंपल कपाडिया यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कधीच या अभिनेत्याला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे राजेश खन्ना यांच्यासोबतचं आपलं नातं संपुष्टात आल्याचं वृत्त त्यांनी फेटाळत ही सर्व माहिती चुकीची असल्याचं म्हटलं आहे.
मुलींसोबत नेहमीच खन्ना यांची भेट घेण्यासाठी जात असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कधी कधी जावई अक्षय कुमारही आपल्यासोबत यायचा असं त्यांचं म्हणणं आहे. मुख्य म्हणजे मृत्युपत्र लिहिताना खन्ना पूर्णपणे शुद्धीत असून, त्यांनी संपूर्ण विचार करुनच मृत्युपत्र लिहिलं होतं, असं सांगत राजेश खन्ना यांची आपण खूप काळजी घेतल्याचं सांगत डिंपल यांनी आपला मुद्दा मांडला आहे.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

दरम्यान, दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या कुटुंबियांना त्यांची काळजी नव्हती, असा आरोप अनिता अडवाणी यांनी केला होता. राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा अनिता अडवाणी यांनी केला होता. त्याच आधारावर राजेश खन्ना यांची जोडीदार म्हणून आपल्याला कायदेशीर हक्क आणि आर्थिक मोबदला मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयात राजेश खन्ना यांची पत्नी डिंपल, मुलगी ट्विंकल, रिंकी आणि जावई अक्षय कुमार यांच्याविरुद्द तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, रिंकी यांना नोटीस पाठवली होती. यालाच उत्तर देत आपण राजेश खन्ना यांच्याशी घटस्फोट घेतला नसल्याचं सांगत विवाहित पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहणं बेकायदेशीर आहे, हा मुद्दा डिंपल यांनी उचलून धरला होता. त्यामुळे आता याप्रकरणी पुढील सुनावणीकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 8:00 pm

Web Title: superstar rajesh khanna ashirwad bungalow in supreme court actress wife dimple kapadia
Next Stories
1 राजमाता शिवगामी देवीचा ‘हा’ नवा लूक पाहिलात?
2 दीपिकाच्या वडिलांनी लिहिलेल्या ‘त्या’ पत्राचा शालेय अभ्यासक्रमात समावेश
3 बिग बींच्या ‘त्या’ घरासमोर उभं राहून अॅश- अभिषेकने काढला फोटो
Just Now!
X