News Flash

थलायवाने आलिशान लॅम्बॉर्गिनी चालवली, सोशल मीडियावर चाहते सुसाट

रजनीकांत यांनी सामान्य जीवनात कधीच त्यांच्या लूकला फार महत्त्व दिलं नाही. सार्वजनिक ठिकाणी ते साधेपणानेच वागतात.

रजनीकांत

दाक्षिणात्य सुपरस्टार व थलायवा म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ६९ वर्षांचे रजनीकांत या फोटोंमध्ये तीन कोटींची Lamborghini Urus गाडी चालवताना दिसत आहेत. मोठ्या पडद्यावर स्टायलिश दिसणारे रजनीकांत हे खऱ्या आयुष्यात खूप साधे राहतात. पांढरा कुर्ता व लुंगी परिधान केलेल्या रजनीकांत यांचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

चेहऱ्याला मास्क लावून, सीटबेल्ट लावून रजनीकांत यांनी ही महागडी गाडी चालवली. त्यांचा हा फोटो पाहून अनेकांनी लॅम्बोर्गिनीमध्ये सिंह बसलाय अशी कमेंट दिली. रजनीकांत यांच्या फॅनपेजवर हे फोटो व्हायरल झाले आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते मुलगी सौंदर्यासोबत पाहायला मिळत आहेत. रजनीकांत यांचा हा साधा अंदाज नेटकऱ्यांना खूपच भावला आहे.

आणखी वाचा : प्रोफेसरच्या चोरीचा नवीन मामला; ‘मनी हाइस्ट’चा पाचवा सिझन लवकरच..

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी मेकअपने आपलं वय कधीच लपवलं नाही. अस्सलतेच्या आविष्कारातच कला आणि कलावंत यांची महत्ता असते, हे त्यांनी वेळोवेळी पटवून दिलंय. एरव्ही कुठल्याही कार्यक्रमात ते अत्यंत साध्या वेशातच दिसतात. चित्रपटातील लूक वगळता रजनीकांत यांनी सामान्य जीवनात कधीच त्यांच्या लूकला फार महत्त्व दिलं नाही. सार्वजनिक ठिकाणी ते साधेपणानेच वागतात. त्यांचा हाच साधेपणा त्यांना ‘सुपरस्टार’ बनवून जातो, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 4:50 pm

Web Title: superstar rajinikanth drove lamborghini urus car and poses with daughter soundarya see pics ssv 92
Next Stories
1 ख्रिस्तोफर नोलनला करोनाचा फटका; वर्षातील सर्वात मोठा चित्रपट तिसऱ्यांदा लांबणीवर
2 प्रोफेसरच्या चोरीचा नवीन मामला; ‘मनी हाइस्ट’चा पाचवा सिझन लवकरच..
3 ….म्हणून सेटवर ‘इश्क सुभान अल्लाह’फेम अभिनेत्रीचे डोळे पाणावले
Just Now!
X