News Flash

Kaala Karikaalan first look: ‘काला’चा फर्स्ट लूक पाहून तुम्हीही म्हणाल, माइंड इट!

...या चित्रपटालाही प्रेक्षक उचलून धरणार

छाया सौजन्य- ट्विटर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देवाप्रमाणे पुजल्या जाणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता धनुषने हा फर्स्ट लूक त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत ‘काला करिकालन’ला सर्वांसमोर आणलं आहे. धनुषने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये रजनीकांत यांचा लूक पाहता त्यांच्या वाढत्या वयाचा लवलेशही चेहऱ्यावर दिसत नाहीये.

‘काला कारिकालन’चा फर्स्ट लूकमध्ये रजनीकांत एका जीपवर बसल्याचं पाहायला मिळत असून त्यांच्या चारही बाजूला रेल्वे रुळ, झोपडपट्टी असं मुंबईचं चित्र पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे रजनीकांत यांचा लूक पुन्हा पुन्हा ‘कबाली’ची आठवण करुन देतोय. हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला असून अवघ्या काही क्षणांतच #Kaala ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला आहे.

सुपरस्टार रजनी यांच्या नावाभोवती असणारं वलय पाहता या चित्रपटालाही प्रेक्षक उचलून धरणार असाच अंदाज वर्तवण्यात येतोय. २८ मे पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यापूर्वीच धनुषने चित्रपटाचं पोस्टर लाँच केलं होतं. या पोस्टरमध्ये काळ्या आणि लाल रंगाची सांगड घालण्यात आली असून, त्यावर रजनीकांत rajinikanth यांचा चेहराही दिसतो आहे. एखाद्या रेखाटलेल्या चित्राप्रमाणे दिसणारा त्यांचा चेहरा पाहता त्यातून राग, आक्रोश आणि सूडाच्या भावनेचं प्रतिबिंब पाहायला मिळतंय.

वाचा: Rajinikanths entry in politics : ‘टायटॅनिक हिरो ऑफ तमिळनाडू, सन ऑफ इंडिया…. इट इज राइट टाइम’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 6:49 pm

Web Title: superstar rajinikanths kaala karikaalan first look thalaivar dhanush twitter tweet photos
Next Stories
1 VIDEO : प्री वेडिंगवरही राणादा अन् अंजली बाईंचीच जादू
2 VIDEO: रितेश देशमुखचे कप साँग पाहिले का?
3 Tubelight Trailer Watch Video : ‘ट्युबलाइट’चा सिक्वल ‘एलईडी’ असेल, सलमानची मार्मिक टिप्पणी
Just Now!
X