News Flash

Kaala Movie : पहिल्याच दिवशी ‘काला’ची पायरेटेड कॉपी लीक, चाहत्यांची सटकली

वेबसाइटवरुन चित्रपटाची HQ and HD print पोस्ट करण्यात आली असून हा संपूर्ण चित्रपट पहाटे ५.२८ मिनिटांनी पोस्ट करण्यात आला होता.

काला, kaala

कर्नाटकमध्ये चित्रपटाला होणारा विरोध असो किंवा मग अब्रुनुकसानीचा दावा असो. हे सर्व अडथळे दूर झाल्यानंतर अखेर सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’ kaala हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सकाळी चार वाजल्यापासून ‘काला’च्या सर्व शो ला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली होती. पण, या उत्साही वातावरणालाही गालबोट लागलं. कारण, हा चित्रपटही लीक झाला.

‘तमिलरॉकर्स’ या पायरसी वेबसाइटवरुन काला लीक झाल्याचं वृत्त सध्या अनेकांच्या भुवया उंचावत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याच दिवशी अशा प्रकारे तो लीक होणं चाहत्यांना मात्र अजिबात रुचलं नसल्यामुळे त्यांनी याविषयीची नाराजी व्यक्त केली आहे. ज्यावेळी या चित्रपटाच्या पायरेटेड व्हर्जनची लिंक सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हापासूनच रंगाचा बेरंग झाल्याचं म्हणत चाहत्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत त्या वेबसाइटला धारेवर धरलं.

फक्त वेबसाइटच्याच माध्यमातून नव्हे तर, चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या काही प्रेक्षकांनीसुद्धा मोबाईलच्या माध्यमातून चित्रपटाचं लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यास सुरुवात केली. तामिळ चित्रपट निर्माते संघटनेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या निर्माता- अभिनेता विशालने या प्रकरणात तातडीने लक्ष घातलं. त्यासोबतच चित्रपटाचं लाइव्ह स्ट्रिमिंग करणाऱ्या व्यक्तीला कॅथी, सिंगापूर येथून अटक करण्यात आल्याचंही स्पष्ट केलं.

पाहा : kaala video : ‘काला’साठी चेन्नईत अशी साकारली धारावी

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटनुसार ‘तामिळरॉकर्स’ या वेबसाइटवरुन चित्रपटाची HQ and HD print पोस्ट करण्यात आली होती. त्याशिवाय हा संपूर्ण चित्रपट पहाटे ५.२८ मिनिटांनी पोस्ट करण्यात आला होता. या सर्व गोष्टी पूर्णपणे चुकीच्या असून धनुष आणि विशालने त्याविरोधात पावलं उचलण्याची मागणी आता चाहत्यांच्या वर्तुळातून करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 2:24 pm

Web Title: superstar rajinikanths kaala movie leaked on a piracy website fans express disappointment
Next Stories
1 ‘त्या’ मुलीच्या शिक्षणाचा खर्च सलमान उचणार!
2 Simmba : जो देतो त्रास त्याचा मी घेतो क्लास, म्हणतोय संग्राम भालेराव
3 एका दिवसात ४० सिगरेट्स पिऊन अमृता खानविलकरचा घसा बसला !
Just Now!
X