आयुषमान खुराना या एका नावातच तुम्हाला सगळे गुण मिळतील. तो उत्तम अभिनेता तर आहेच याशिवाय तो उत्तम गायक, गीतकार आणि संगितकारही आहे. त्याला लिखाणाचीही आवड आहेच. त्यामुळे सर्व गुण संपन्न अशा या गुणी कलाकाराला स्टारडम या शब्दावर विश्वास नाही.
‘खरे स्टारडम राजेश खन्ना, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांनी अनुभवले आहे आणि अजूनही अनूभवत आहेत. असे असले तरी स्टारडम हे काही कायमस्वरुपी नसते. कारण नेहमीच नवनवे कलाकार सिनेसृष्टीत येत असतात. एकदा का या सिनेसृष्टीत कलाकार आला की तो स्वतःचे स्थान घट्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्यावेळी ‘स्टारडम’चा आनंद घेणाऱ्या कलाकारानंतरची दुसरी फळी तयार होत असते. एकदा का ती फळी तयार झाली की पहिल्यांचे स्टारडम निघून जाते.’

दरम्यान, ‘मेरी प्यारी बिंदू’ या सिनेमाचा बहुप्रतिक्षित पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला. या आधीही या सिनेमाचे चित्रिकरणावेळचे फोटो आणि पोस्टर्स शेअर करण्यात आले होते. पण याआधीच्या पोस्टर्स आणि फोटोंपेक्षा आताचे पोस्टर फार वेगळे आहे. अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री परिनीती चोप्रा या पोस्टरमध्ये फार वेगळे दिसत आहेत. ते बंगाली पारंपारिक वेषात दिसत नाही. या दोघांना बघून ९० च्या दशकातले आमिर खान आणि जुही चावला आठवल्याशिवाय राहत नाहीत. हा सिनेमा पुढच्या वर्षी १२ मेला प्रदर्शित होणार आहे.

Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
Did Marathas renamed Ramgarh as Aligarh
मराठ्यांनी रामगढचे अलिगढ असे नामांतर केले? इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णींनी मांडलं सत्य
Geographical mind Geographical knowledge about the battlefield
भूगोलाचा इतिहास: भौगोलिक बुद्धिबळ
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”

तर दुसरीकडे, क्रिती सेनन, राजकुमार राव आणि आयुषमान खुराना यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला बरेली की बर्फी हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची तारीखही नक्की झाली आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री क्रिती सेननने सोशल मीडियावर याबद्दलची घोषणाही केली होती. यावेळी तिने आयुषमान खुरानासोबत तिने एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या मेसेजमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख लिहिलेली होती.

https://www.instagram.com/p/BNW0z4pj1yy/

या सिनेमाचे अधिकतर चित्रिकरण लखनऊमध्ये पूर्ण झाले आहे. या सिनेमाच्या कथानकाबद्दल अजून काही कळले नाही. पण ‘निल बटे सन्नाटा’ सिनेमाची निर्माती अश्विनी अय्यर तिवारी हिच या सिनेमाचीही निर्मिती करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमात आयुषमान एका प्रिन्टिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिकडेच क्रिती एका शहरी मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमात राजकुमार राव एका लेखकाची भूमिका साकारणार आहे. आयुषमान खुराना आणि क्रिती पहिल्यांदा एकत्र काम करत आहे.