बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आधी तेलंगना उच्च न्यायालयाने या चित्रपटावर बंदी घातली होती. अन् आता त्यांच्या या बंदीला थेट सर्वोच्च न्यायालयानेच मान्यता दिली आहे.

अवश्य वाचा – ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहायचा का?’; ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला

नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

नंदी चिन्नी कुमार नामक एका व्यक्तीनं या चित्रपटावर कॉपी राईट्सचा दावा ठोकला होता. या व्यक्तीच्या मते ‘झुंड’ चित्रपटाची कथा त्यांच्या कथेची नक्कल आहे. अर्थात हा दावा ‘झुंड’च्या निर्मात्यांनी फेटाळून लावला. परंतु तेलंगना उच्च न्यायालयाने मात्र बिग बींच्या या चित्रपटावर बंदी घातली. पुढे या बंदी विरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जस्टिस बोबडे, केएस बोपन्ना आणि वी रामा सुब्रमण्यम यांच्या निरिक्षणाखाली हे प्रकरण कोर्टात सुरु होते. मात्र या तीन न्यायाधीशांच्या समीतीनं देखील ‘झुंड’ चित्रपटाला दिलासा दिला नाही. त्यांनी देखील तेलंगना उच्च न्यायालयाच्या बंदीस मान्यता दिली. परिणामी हा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

अवश्य पाहा – VIDEO: ‘करोना अद्याप गेलेला नाही’; पाहा मास्क वापरण्याची योग्य पद्धत

अवश्य वाचा – सोज्वळ सुनेचा ग्लॅमरस अवतार; अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटमुळे चाहते आवाक्

मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले असल्यानं ‘झुंड’बद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट बेतला असल्याचं म्हटलं जात आहे.