News Flash

अभिनेत्री सविता बजाज यांच्या मदतीला धावून आल्या सुप्रिया पिळगावकर

सध्या अभिनेत्री नुपूर अलंकार सविता बजाज यांची काळजी घेत आहेत

‘निशांत’, ‘नजराना’, ‘बेटा हो तो ऐसा’ या सारख्या अनेक चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री सविता बजाज सध्या चर्चेत आहेत. या चर्चा सविता यांच्यावर आर्थिक संकट कोसळल्यामुळे सुरु झाल्या आहेत. त्यांच्याकडे आजारपणावर उपचार करण्यासाठी देखील पैसे नाहीत. आता अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर हे सविता यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

सध्या अभिनेत्री नुपूर अलंकार सविता बजाज यांची काळजी घेत आहेत. नुपूरने नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, ‘सविता बजाज यांच्याविषयी कळल्यानंतर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सुप्रिया यांच्यासोबत काही CINTAAचे मेंबर्स देखील सविता यांची मदत करत आहेत. जेणे करुन त्यांना हॉस्पिटलचे बिल भरता येईल.’

आणखी वाचा : तुम्ही सेविंग्स का ठेवत नाही?; सविता बजाज यांच्या परिस्थितीवर सचिन पिळगावकरांची प्रतिक्रिया

पुढे नुपूरने सविता यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली. ‘सवित यांना सध्या आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांना आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे’ असे नुपूरने सांगितले आहे.

सविता बजाज यांनी आपण आर्थिक अडचणीत सापडल्याबाबत खुलासा मुलाखतीमध्ये केला. केवळ इतकंच नव्हे तर त्यांच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. जपून ठेवलेल्या पैशांवर आतापर्यंत त्यांनी कसेबसे दिवस काढले. परंतु आता त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच वाढत्या आजारपणाचा उपचार करण्यासाठी पैसेच उरले नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 5:24 pm

Web Title: supriya pilgaonkar comes out for financial support for savita bajaj avb 95
Next Stories
1 ‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन पर्वासाठी चाहात्यांन सोबतच टिव्ही कलाकार देखील आतुर
2 ‘ती परत आलीये’ नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमो प्रदर्शित
3 ‘मी प्रयत्न करतोय पण गोष्टी हाताबाहेर जात आहेत’, ‘कसौटी जिंदगी की’ अभिनेता करतोय नैराश्याचा सामना
Just Now!
X