सत्य घटनांवर आधारित वेब सीरिज ‘होम’च्या माध्यमातून अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर वेब विश्वात पदार्पण करत आहेत. अल्ट बालाजी ALTBalaji अॅपवर ही सीरिज स्ट्रिमिंगसाठी सज्ज झाली आहे. एकूण बारा एपिसोड्सची ही सीरिज मुंबईतील ‘कॅम्पा कोला’ इमारतीवरुन झालेल्या वादावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. बारापैकी सहा एपिसोड्स २९ ऑगस्टपासून अल्ट बालाजी अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

या वेब सीरिजच्या माध्यमातून घरासाठी संघर्ष करणाऱ्या मध्यवर्गीय कुटुंबाची गोष्ट मांडली जाणार आहे. मुंबईतील ‘कॅम्पा कोला’ इमारतीचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं. इमारत अनधिकृत असून ती पाडण्याचा आदेश न्यायालायने दिला होता. त्यानंतर नागरिकांनी त्याविरोधात लढा पुकारला होता. नेमकी हीच गोष्ट या वेब सीरिजमध्ये सांगितली जाणार आहे.

वाचा : ‘मनमर्जियां’नंतर अभिषेकचं करिअर सावरणार?

या वेब सीरिजमध्ये सुप्रिया पिळगावकर यांच्यासहित अन्नू कपूर, अमोल पराशर आणि परीक्षित साहनी मुख्य भुमिकेत आहेत. हबीब फैसल यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं असून ‘इशकजादे’, ‘दो दुनी चार’ आणि ‘दावत ए इश्क’ यांसारख्या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर आता डिजीटल विश्वात ते आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत.