कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली आणि तब्बल पाच महिने त्यांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सची तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींची देखील वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. २२ सुरवीरांचा सुरेल प्रवास पाच महिन्यांआधी सुरू झाला आणि या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले. रविंद्र खोमणे, स्वराली जोशी, अक्षया अय्यर, अमोल घोडके, राजू नदाफ, श्रावणी वागळे या अंतिम सहा शिलेदारांपैकी अक्षया अय्यरने बाजी मारली आहे. अक्षया अय्यरने सूर नवा ध्यास नवाची राजगायिका होण्याचा मान पटकावला.

अक्षया अय्यरला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, वामन हरी पेठे सन्स यांनी डिझाईन केलेली मानाची सुवर्णकटयार आणि केसरी टूर्सतर्फे सिंगापूरची टूर मिळाली. तसेच रविंद्र खोमणेला, स्वराली जोशी, अमोल घोडके, राजू नदाफ, श्रावणी वागळे या उपविजेत्यांना कलर्स मराठीतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी, तसेच उपविजेते, कॅप्टन्स, सूत्रसंचालक यांना केसरी टूर्सतर्फे गिफ्ट व्हाऊचर मिळाले.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Hardik Emotional After Third Defeat
MI vs RR : ‘आम्ही लढत राहू आणि पुढे…’, सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट व्हायरल

‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमामध्ये झुंझार अमोल घोडकेचा बुलंद आवाज, जिच्या ध्यानीमनी सतत असतात गाणी अशी श्रावणी वागळे, लिटल वंडर अक्षया अय्यरचे कुठलेही गाणे सहज गाण्याची कला, मराठवाड्याचे खणखणीत नाणे रविंद्र खोमणे, जिच्या आवाजाची खुमारी सर्वांपेक्षा निराळी अशी स्वराली जोशी, टीपेचा सूर आणि इंटेन्स इमोशन्सचा मिलाफ राजू नदाफ यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या सहा स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला. महाअंतिम सोहळ्यामध्ये अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांनी त्यांच्या दमदार गाण्यांनी स्पर्धक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महेश काळे यांनी गाण सादर करून उपस्थितांना पुन्हाएकदा भारावून टाकले.