19 September 2020

News Flash

‘सूर नवा ध्यास नवा -छोटे सुरवीर’ न्यू इअर विशेष भाग रंगणार या दिवशी

'भाई – व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाची टीम या मंचावर उपस्थित राहणार आहे

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमातील आपल्या सगळ्यांचे लाडके सूरवीर नव्या वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज आहेत. त्यांच्या सुरेल गाण्यांनी हे सूरवीर नव्या वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला एक सुरेल नजराणा देणार आहेत. कलर्स मराठीवरील या खास भागाचे विशेष म्हणजे त्यामध्ये एलीमनेट झालेले स्पर्धकदेखील सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत. आपल्या सगळ्यांचा लाडका हर्षद नायबळ यामध्ये मॉनिटर म्हणजेच “DJ” बनणार आहे. हा भाग नवीन वर्षाच्या १ आणि २ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाची टीम या मंचावर उपस्थित राहणार आहे. यामध्ये महेश मांजरेकर, सुनील बर्वे, इरावती हर्षे, विद्याधर जोशी, सचिन खेडेकर आणि सागर देशमुख यांचा सहभाग असेल.

या न्यू ईयर स्पेशल भागामध्ये गाणी तर रंगणारच आहेत पण, काही हटके पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट पालक पुरस्कार, पालकांचे पालक पुरस्कार, लेट लतीफ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पीजे मार खा पुरस्कार, नखरेल ड्रामा क्वीन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हावभाव पुरस्कार, शक्तिमान पुरस्कार अशी त्यांची नावे आहेत. आता या पुरस्कारांचे मानकरी कोण ठरणार हे तुम्हाला ३१ डिसेंबरच्या भागामध्ये कळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमाचा न्यू इयर स्पेशल भाग ३१ डिसेंबर रोजी रात्री ९.३० पासून ३ दिवस फक्त कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 1:12 pm

Web Title: sur nava dhyas nava chote survir new year special episode will be telecast on 1st and 2nd january
Next Stories
1 रणवीर -दीपिकानं चार वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा
2 Flashback 2018 : वर्ष वेबसीरिजचं.. सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज, मिर्झापूर आणि बरंच काही..
3 Thackeray Movie : मराठीत पुन्हा डबिंग करा; बाळासाहेबांना या व्यक्तीचा आवाज द्या- प्रेक्षकांची मागणी
Just Now!
X