09 August 2020

News Flash

‘तारक मेहतामधून मला बाहेर काढले होते’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

'त्या' कारणामुळे अभिनेत्रीला रिप्लेस केलं जाणार होतं

‘इश्कबाज’ या मालिकेमधून नावारुपास आलेली सुरभी चंदना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दमदार अभिनयाच्या जोरावर सुरभीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. परंतु कधीकाळी खराब अभिनयासाठीच तिला ‘तारक मेहता’ या मालिकेमधून बाहेर काढण्यात आले होते.

अवश्य पाहा – मराठी अभिनेत्रीनं पोस्ट केला नवऱ्याबरोबरचा किसींग करताना फोटो

सुरभीने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेत एका सेल्स गर्लची भूमिका साकारली होती. तिला या मालिकेत जेठालालसोबत अफेअर असल्याचे नाटक करायचे होते. परंतु तिचा अभिनय दिग्दर्शकांना आवडला नाही. त्यामुळे चित्रीकरण सुरु असतानाच तिला बाहेर काढण्यात आले. पिंकव्हिला दिलेल्या मुलाखतीत सुरभीने हा धक्कादायक किस्सा सांगितला.

अवश्य वाचा – “हॉस्पिटलचं बिल भरून मी कंगाल झालोय”; आजारी अभिनेत्याने मागितली आर्थिक मदत

“तारक मेहता ही माझी पहिली मालिका होती. या मालिकेतून मी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. माझ्याकडे अभिनयाचा फार मोठा अनुभव नव्हता. माझ्या अभिनयाची शैली दिग्दर्शकांना आवडत नव्हती. त्यामुळे त्यांनी भर शूटिंगमधून मला बाहेर काढले होते. मी सेटच्या बाहेर बसून रडत होते. दिग्दर्शकांनी मला रिप्लेस करण्याचा निश्चय केला होता. परंतु माझ्या आईच्या विनंतीमुळे त्यांनी मला आणखी एक संधी दिली.” असा अनुभव तिने सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 1:37 pm

Web Title: surbhi chandna says she was thrown out from taarak mehta ka ooltah chashmah mppg 94
Next Stories
1 “हॉस्पिटलचं बिल भरून मी कंगाल झालोय”; आजारी अभिनेत्याने मागितली आर्थिक मदत
2 ऑनस्क्रिन ‘भल्लालदेव’ची रिअल लाईफमधली ‘देवसेना’; पाहा साखरपुड्याचे फोटो
3 मराठी अभिनेत्रीचा पतीसोबत बोल्ड अवतार; फोटो होतोय व्हायरल
Just Now!
X