News Flash

‘बाजीराव-मस्तानी’ ‘या’ ठिकाणी आहेत सिक्रेट हॉलिडेवर

व्हिडिओमध्ये दोघही कूल अंदाजात दिसत आहेत.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, ranveer, deepika

सध्याच्या घडीला बी- टाऊनमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींचे रिलेशनशिप चर्चेत आहेत. त्यापैकीच एक जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण. रणवीर आणि दीपिका यंदाच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याचं या वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं. त्यामुळे सध्या बॉलिवूडची ही जोडी लग्नाच्या तयारीला लागली असून या काळातही ते एकमेकांना वेळ देताना दिसत आहे.

दिपिका पदुकोण आणि रणवीर सिंह सध्या फ्लोरिडामध्ये त्यांचा क्वालिटी टाईम्स घालवत असून नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन ते डिज्नीलॅड फिरताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोघही कूल अंदाजात दिसत असून दीपिकाची बहीण अनीशाही असल्याचं पाहायला मिळत आहे.

ही सिक्रेड हॉलिडेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे ते हॉलिडेवर गेल्याचं समोर आलं आहे. त्यातच सध्या हे दोघं फ्लोरिडामध्ये मौजमस्ती करत असून या व्हिडिओमध्ये त्यांनी एकमेकांचा हात धरल्याचं दिसून येत आहे. लवकरच या दोघांची लग्नगाठ बांधणार असून त्यांनी डेस्टीनेशन वेडिंगला प्राधान्य दिल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 12:28 pm

Web Title: surprise deepika ranveer secret holiday walks hand in hand on street
Next Stories
1 कथानकाला विचित्र म्हणत आमिरने सुरुवातीला नाकारला होता ‘लगान’
2 प्रीतीने दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी नेस वाडिया न्यायालयात
3 नऊ किलो सोनं चोरणाऱ्या मराठी चित्रपट निर्मात्याला अटक
Just Now!
X