30 October 2020

News Flash

बॉलिवूड माफियांमुळे सारा-सुशांतचा ब्रेकअप झाला? सुशांतच्या मित्राची पोस्ट व्हायरल

सारा आणि सुशांतने केदारनाथ चित्रपटात एकत्र काम केले

अभिनेत्री सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता. या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या वेळी सारा आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचा खुलासा सुशांतचा मित्र सॅम्युअल होकिपने केला आहे. तसेच बॉलिवूडमधील माफियांच्या दाबावामुळे त्यांचा ब्रेकअप झाल्याचे देखील त्याने म्हटले आहे.

सॅम्युअलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, ‘मला आजही आठवते केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सुशांत आणि सारा एकमेकांच्या प्रेमात होते. ते एकमेकांचा आदरही करायचे आणि हा आदर फार कमी रिलेशनशीपमध्ये पाहायला मिळतो’ असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

We accept the love we think we deserve -Stephen Chbosky

A post shared by Samuel Haokip (@jamlenpao) on

सारा सुशांतसोबतच त्याच्या कुटुंबीयांचा, मित्रांचा तसेच त्याच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करायची. मात्र सुशांतचा सोनचिडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अचानक साराने ब्रेकअप केला. त्यांच्या ब्रेकअपचे कारण मला आजही समजले नाही. त्यांचा ब्रेकअप बॉलिवूड माफियांच्या दबावामुळे झाला असावा या आशयाची पोस्ट सॅम्युअलने केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 5:17 pm

Web Title: sushant and sara ali khan were totally in love sushant singh rajputs friend samuel haokip reveal avb 95
Next Stories
1 अग्गंबाई सासूबाई : आता अभिजीत होणार बबड्या?
2 पाकिस्तानी अभिनेता साकारणार सुशांतची भूमिका?
3 लॉकडाउनमध्ये रिकामटेकड्या लोकांमुळे वाढतंय ट्रोलिंग- सोनाक्षी सिन्हा
Just Now!
X