04 March 2021

News Flash

सुशांत सिंह आत्महत्या: रिया चक्रवर्ती पुन्हा ईडी कार्यालयात दाखल

यापूर्वी रियाची आठ तास चौकशी झाली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडीनं रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू केली असून, रिया आज (१० ऑगस्ट) पुन्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचली आहे.

रिया चक्रवर्तीची यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी ईडीने आठ तास चौकशी केली होती. तसेच आज पुन्हा रिया, तिचा भाऊ शोविक आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची पुन्हा ईडीकडून या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी रियाचा भाऊ शोविकचीही ईडीने जवळपास १८ तास चौकशी केली होती.

‘सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूअसेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये’, अशी विनंती रियाने आपल्या वकिलांमार्फत केली होती. परंतु ईडीने ही विनंती फेटाळली. त्यामुळे रिया चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पुन्हा पोहोचली.

सुशांतचे वडील के. के सिंह यांनी रियाने सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप केलेला. त्यामुळे ईडीनं या प्रकरणात लक्ष घातलं असून, या प्रकरणी चौकशीसाठी रियाला बोलावण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 11:19 am

Web Title: sushant singh case rhea chakraborty arrives at enforcement directorate ed office in mumbai avb 95
Next Stories
1 करोना काळात छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अडकली लग्न बंधनात
2 कंगनाचा अप्रत्यक्षपणे आयुषमानवर निशाणा; म्हणाली, “चापलूस तर…”
3 दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा वाढदिवशी विश्वविक्रम
Just Now!
X