News Flash

सुशांत सिंह प्रकरणात रियाने प्रसिद्ध वकिलाला केलं नियुक्त, एका दिवसाची फी ऐकून थक्क व्हाल

रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्ती अडचणीत येताना दिसत आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. रिया चक्रवर्तीनेदेखील आपला बचाव करण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. रियाने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी देशातील प्रसिद्ध आणि महागड्या वकिलाला नियुक्त केलं आहे. प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे रियाची केस हाताळत आहेत. सतीश यांनी याआधी अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस हाताळली आहे. झी न्यूजने बॉलिवूड लाइफच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणानं बुधवारी वेगळं वळणं घेतलं. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी त्याची रिया चक्रवर्तीविरोधात खळबळजनक आरोप केले. या प्रकरणी बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यात जामीन मिळवण्यासाठी रियानं अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढणाऱ्या भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या मानशिंदे यांना नेमलं आहे.

रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी सलमान खानच्या १९९८ मधील काळवीट शिकार आणि संजय दत्तच्या १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात बाजू मांडली होती. सतीश मानशिंदे यांनी सलमान खानला ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात जामीनही मिळवून दिला होता. सतीश मानशिंदे देशातील महागड्या वकिलांपैकी एक असून २०१० मधील एका रेकॉर्डनुसार ते दिवसाला १० लाख रुपये फी घेतात. त्यांच वय ५० असून त्यांना महागड्या गाड्यांची आवड आहे. सतीश मानशिंदे यांनी मंगळवारीच रियाच्या अटकपूर्व जामीनाचे कागदपत्र तयार केले असून, मंगळवारी रात्री त्यांच्या सहाय्यक वकील आनंदिनी फर्नांडिस या रियाच्या घराबाहेर दिसल्या होत्या.

सुशांतच्या वडिलांनी काय आरोप केले आहेत ?
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास आणि धमक्या दिल्याचाही आरोप आहे. तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “रिया सुशांतसोबत एकत्र राहत होती. आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी तिने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रं सोबत नेली. यानंतर रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. सुशांतने आपल्या बहिणीला फोन करुन रियापासून धोका असल्याचं सांगितलं होतं. रियाने आपल्याला धमकावलं असून वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचं सुशांतने आपल्या बहिणीला सांगितलं होतं”.

“सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला होती,” असंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 8:32 pm

Web Title: sushant singh death case rhea chakraborty lawyer satish maneshinde charging high fees sgy 87
Next Stories
1 Video : सोनू सूदला यानंतरच कंगनाने केला होता विरोध; पहिल्यांदाच समोर आला ‘तो’ सीन
2 Sushant Suicide Case: “असत्याचा पराभव निश्चित”; अभिनेत्याचं रियाच्या वकिलांना आव्हान
3 प्रदर्शनाच्या २४ तासात साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला ‘दिल बेचारा’
Just Now!
X