09 March 2021

News Flash

सुशांत सिंह प्रकरण : काळी जादू करण्यासाठी रियाने केला सुशांतच्या पैशांचा वापर?

सुशांतच्या कुटुंबीयांचा रियावर आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणाचा गुंता सुटण्याऐवजी तो आणखीनच गुंतत चालल्याचं पाहायला मिळत आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यातच आता काळी जादू करण्यासाठी रियाने सुशांतच्या खात्यातून २.९३ लाख रुपये काढल्याचं ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्ता नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाला वेगळंच वळण लागल्याचं दिसून येत आहे.

पूजा करण्यासाठी रियाने सुशांतच्या खात्यातून जवळपास २.९३ लाख रुपये काढले होते. मात्र रियाने कोणत्याही प्रकारची पूजा केली नाही. त्यामुळे रियाने सुशांतवर काळी जादू करण्यासाठीच हे पैसे काढल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

दोन महिन्यांमध्ये सुशांतच्या खात्यातून २ लाखांपेक्षा अधिक रक्कम पूजा करण्याच्या नावाखाली काढण्यात आली होती. ही पूजा २०१९ मध्ये होणार होती. परंतु, ती झाली नाही. सुशांतची बहीण या खात्याची नॉमिनी असल्यामुळे या खात्यातून रक्कम काढण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. तसंच सुशांत प्रत्येक वेळी बॅकेतून पैसे काढल्यानंतर त्याचा हिशोब लिहून ठेवत होता. मात्र त्याने काढलेली रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी वापरली हे स्पष्ट झालेलं नाही. तो लहान सहान खर्च किंवा रियासाठी केलेला खर्च कधी लिहून ठेवत नव्हता.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरणं सध्या चांगलंच चर्चिलं जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आता चाहते आणि कलाविश्वातील काही सेलिब्रिटींकडून होऊ लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 11:25 am

Web Title: sushant singh rajput account transaction shows deduction for pooja family alleges black magic ssj 93
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 सुशांत सिंह प्रकरण : रियाचं कुटुंबीयांसोबत मध्यरात्री गुपचूप पलायन?
2 “ते दोघे एकदाच भेटले तर…”; दोन्ही आत्महत्येंचा संबंध असल्याचे म्हणणाऱ्यांना दिशाच्या आईचा सवाल
3 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला सक्तीने केलं क्वारंटाइन
Just Now!
X