News Flash

आलिया-सोनमकडे चाहत्यांनी फिरवली पाठ; काही तासांत इतके लाख फॉलोअर्स झाले कमी

सुशांतबाबत 'ती' पोस्ट करणं आलिया भट्ट सोनम कपूरला पडलं भारी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अनेक कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. अन् याचा सर्वाधिक दोष दिला जातोय निर्माता करण जोहर, अभिनेता सलमान खान, अभिनेत्री आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांना. या मंडळींनी सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही सोशल मीडिया पोस्ट केल्या होत्या. मात्र या पोस्टमुळे नेटकरी प्रचंड संतापले आहेत. परिणामी त्यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता कमालीची कमी झाली आहे.

सलमान आणि करणला ‘नेपोटिझम प्रमोटर’ असं म्हटलं जात आहे. या मंडळींनी स्टार किड्सला संधी मिळावी म्हणून अनेकांची करिअर संपवली असा अरोप त्यांच्यावर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर करणचे एक लाख ८८ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. तर दुसरीकडे सलमानचे ५० हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत.

घराणेशाही विरोधातील संतापाचा सर्वाधिक फटका बसलाय तो अभिनेत्री आलिया भट्टला. तिचे तब्बल चार लाख ४४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री सोनम कपूरच्या बाबतीत घडला आहे. तिचे ८४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. या सर्व मंडळींनी कधीनाकधी सुशांतची खिल्ली उडवली होती. त्यांचे व्हिडीओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नेटकरी संतापले आणि त्यांनी या कलाकारांना अनफॉलो करण्यास सुरुवात केली.

एकीकडे बॉलिवूडमधील घराणेशाहीचा पुरस्कार करणाऱ्या कलाकारांचे फॉलोअर्स कमी होत आहेत. तर दुसरीकडे त्यांचा विरोध करणाऱ्या कंगनाचे फॉलोअर्स मात्र वाढत आहेत. तिने सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला दोष दिला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांमध्ये तिचे तब्बल १२ लाख फॉलोअर्स वाढले. यापूर्वी तिचे केवळ २० लाख फॉलोअर्स होते. आता ३२ लाख लोक तिला फॉलो करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 12:06 pm

Web Title: sushant singh rajput alia bhatt karan johar samah khan sonam kapoor mppg 94
Next Stories
1 “जलसासमोर गर्दी करु नका”; बिग बींचे चाहत्यांना आवाहन
2 ‘अभय २’मध्ये राम कपूर दिसणार अनोख्या अंदाजात, शेअर केला फर्स्ट लूक
3 ‘जिंदगी ना मिलेगी दोबाराच्या वेळी फक्त हृतिकला…’, अभय देओलने व्यक्त केला राग
Just Now!
X