18 January 2021

News Flash

‘सुशांतला न्याय मिळेल का?’; श्वेता सिंह किर्तीच्या पतीचा प्रश्न

सुशांतच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट झालेलं नाही. सध्या या प्रकरणी सीबीआय, एनसीबी यांच्याद्वारे तापस सुरु आहे. तर दुसरीकडे सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळावा यासाठी जोरदार मागणी करत आहेत. यामध्येच सुशांतच्या मेहुण्याने श्वेता सिंह किर्तीच्या पतीने एक पोस्ट शेअर करत सुशांतला न्याय मिळेल का असा प्रश्न विचारला आहे. सोबतच त्यांनी सुशांतचा एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे.

सुशांतचे मेहुणे विशाल किर्ती यांनी एका लग्नातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत सुशांत दिसून येत आहे. “आपण अंतिम रेषेपर्यंत पोहोचलो आहोत? सुशांतला खरंच न्याय मिळेल का? सुशांतचा निरागस चेहरा दिवसाच नाही तर रात्रीदेखील आमच्या स्वप्नांमध्येही राज्य करु लागला आहे”, अशी पोस्ट विशाल किर्ती यांनी शेअर केली आहे.

दरम्यान, १४ जून रोजी सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. काहींच्या मते, सुशांतने नैराश्यात येऊन हे पाऊल उचललं. तर काहींच्या मते, बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने जीवनाचा अंत केला. मात्र, अद्यापही त्याच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट झालेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 8:45 am

Web Title: sushant singh rajput brother in law vishal kirti says will sushant get justice ssj 93
Next Stories
1 ‘पिछे देखो पिछे’ म्हणत नेटकऱ्यांची मनं जिंकणाऱ्या अहमदचा सोनू सूदसाठी खास मेसेज; म्हणाला…
2 बंद असलेल्या चित्रपटगृहांना आशेचा किरण
3 ‘जानसे मारेंगे तभी जी पायेंगे.. ‘ मिर्झापूर 2 चा आणखी जबरदस्त टिझर
Just Now!
X