अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर योग गुरु बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली. सुशांतला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्याची हत्या करण्यात आली, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

अवश्य पाहा – ‘म्हातारी’ म्हणून चिडवणाऱ्या ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली; दिली कायदेशीर कारवाईची धमकी

रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बाबा रामदेव यांनी सुशांत प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले, “सुशांत एक महत्वाकांक्षी कलाकार होता. त्याला आयुष्यात खूप काही मिळवायचं होतं. नियोजनबद्ध आयुष्य जगणारा व्यक्ती कधीच आत्महत्या करणार नाही. तो ज्या बॉलिवूडमध्ये काम करत होता ते क्षेत्र ड्रग्जसारख्या वाईट सवयींनी बरबटलेलं आहे. सुशांतला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्याची हत्या करण्यात आली. एनसीबी लवकरच खऱ्या गुन्हेगारांना शोधून काढेल याची आम्हाला खात्री आहे.”

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; ही अभिनेत्री साकारणार रिया चक्रवर्तीची भूमिका

रिया-शोविक अंमलीपदार्थाच्या टोळीचे सक्रिय सदस्य

सुशांत सिंह राजपूतला मृत्यूपूर्वी अंमली पदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया आणि शोविक चक्रवर्ती हे अंमली पदार्थांच्या टोळीचे सक्रिय सदस्य आहेत, असा दावा एनसीबीने केला आहे. तिने सुशांतला त्याचे सेवन करण्यास उद्युक्त केले. तसेच त्याला ते उपलब्ध करून दिले, त्यासाठी अर्थपुरवठा केल्याचा आरोपही एनसीबीतर्फे यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. आरोपींनी केलेला गुन्हा हा संघटित गुन्हेगारीच आहे. अटकेच्या भीतीने रियाने काही सांगितले नाही. तिला हा सगळा प्रकार बेकायदा असल्याचे माहीत होते. त्यानंतरही ती त्यात गुंतली होती, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.