अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण चौकशीमुळे चर्चेचं केंद्र ठरलं आहे. पाटणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, चौकशीसाठी आलेल्या पोलीस अधीक्षकांना क्वारंटाइन करण्यात आलं. त्यावरून बिहार पोलिसांकडून मुंबई पोलिसांवर आरोप केले जात आहे. बिहारचे पोलीस महासंचालक जी. पांडे यांनीही मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- सुशांतच्या बँक खात्यातून ५० कोटी रुपये काढले गेले, याबाबत मुंबई पोलीस गप्प का?- बिहारचे पोलीस महासंचालक

सुशांत सिंह चौकशी प्रकरणी एएनआयशी बोलताना जी. पांडे म्हणाले,”त्यांनी जबरदस्तीनं आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाइन केलं आहे. जर महाराष्ट्र सरकारला त्यांच्या पोलिसांचा अभिमान वाटत असेल, तर आम्हाला सांगावं, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ५० दिवसांमध्ये काया केलं?, आमच्यासोबतच्या संवादाचे सगळे मार्ग मुंबईकडून (मुंबई पोलिसांकडून) बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे यात काहीतरी चुकीचं आहे, हेच सूचित होतं,” असा आरोप पांडे यांनी केला आहे.

आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला सक्तीने केलं क्वारंटाइन

आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या; बिहार सरकारकडून सीबीआय चौकशीची शिफारस

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात आल्या. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी पाटणा पोलिसांत फिर्याद दिली. अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप केलेला आहे. सुशांतच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर बिहार पोलिसांनी तपास सुरू केला असून, मुंबई पोलिसांकडून सहकार्य केलं जात नसल्याचा आरोपही केला जात आहे.