17 January 2021

News Flash

सुशांत सिंह मृत्यूप्रकरण : शिबानी दांडेकरने उलगडलं ‘त्या’ मिस्ट्री गर्लचं रहस्य

जाणून घ्या, कोण आहे मिस्ट्री गर्ल

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून एका मिस्ट्री गर्लची चांगलीच चर्चा रंगली आहे. एका व्हिडीओमध्ये ही मुलगी सुशांतच्या घरी जाताना दिसून आली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर या मुलीविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी ती शिबानी दांडेकर असल्याचं म्हटलं आहे. परंतु, या चर्चांवर शिबानी दांडेकरने मौन सोडलं असून ती मुली मी नाही असं म्हटलं आहे.
शिबानी दांडेकरने ट्विट करत तिचा संताप व्यक्त केला आहे. ही मुलगी मी नाही, त्यामुळे जरा सत्य जाणून घेतल्यानंतर एखाद्या गोष्टीवर व्यक्त व्हा असे खडेबोलही शिबानीने नेटकऱ्यांना सुनावले आहेत.

“ही व्यक्ती मी नाही आणि सिमोनसुद्धा नाहीये. संशय घेण्यापूर्वी एकदा सत्य काय आहे ते जाणून घ्या. ही मुलगी सुशांत सिंह राजपूतची पीआर आणि अस्टिस्टंट राधिका निहलानी आहे. त्यामुळे अफवा पसरवणं बंद करा. खूप झालं. मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्याही खोट्या आणि चुकीच्या गोष्टी पसरवाल”, असं ट्विट शिबानीने केलं.

सुशांतच्या निधनानंतर राधिका निहलानी सुशांतच्या घरी गेली होती. मात्र पोलिसांनी तिला अडवलं. याच दरम्यान, तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल झाले.

कोण आहे राधिका निहलानी?

राधिका निहलानी ही सुशांतची पीआर होती. ती सुशांतच्या थिंक इन फाऊंडेशनची को फाऊंडर होती. तसंच ती चित्रपट निर्माते आणि सीबीएसी चीफ पहलाज निहलानी यांची सून असल्याचं म्हटलं जातं. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी राधिकाचीदेखील चौकशी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 8:31 am

Web Title: sushant singh rajput case people blame on shibani dandekar as mystery girl ssj 93
Next Stories
1 मुंबईतील रिसॉर्टवर ‘सीबीआय’चा तपास
2 “…म्हणून सुशांत प्रकरणात रणवीरने पाठिंबा दिला नाही”; अभिनेत्याचा खळबळजनक दावा
3 आणखी एका स्टार किडची होणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री
Just Now!
X