बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांमधून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सुशांतने लाखो लोकांच्या मनात घर केले होते. सध्या सोशल मीडियावर त्याचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुशांत रस्त्यावर फुगे विकणाऱ्या महिलेसोबत फोटो काढताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ एक साँग लाँच इवेंटच्या वेळचा आहे.
सुशांत कारमधून उतरतो. दरम्यान तेथे एक महिला फुगे विकत असते. ती सुशांत जवळ येते आणि फोटो काढण्यासाठी सुशांतला विनंती करते. सुशांत त्या महिलेसोबत फोटो काढतो. त्यावेळी सुशांतचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला होता.
सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज तो बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 4:42 pm