बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्यावरून सोमवार सकाळपासून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करुन बिहार पोलीस फक्त कर्तव्य बजावत आहेत. यात कोणताही राजकीय हेतु नाही”, अशा शब्दात त्यांनी आपले मत मांडले. त्याचसोबत भाजपा नेते राम कदम यांनीदेखील या प्रकरणी संबंधित तपास यंत्रणेवर टीका केली. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Fali S Nariman passed away
भोपाळ गॅस प्रकरणापासून ‘या’ ऐतिहासिक निकालांमध्ये नरिमन यांचा सहभाग होता निर्णायक

दरम्यान, बिहारमधून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय नियमाला धरुन आहे असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने त्यांना कोविड १९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाइन) करणे आवश्यक होते असे महापालिकेने म्हटले आहे. आमच्या पथकाने ते थांबलेल्या विश्रामगृहावर पोहोचून सर्व प्रक्रिया समजावून सांगितली, असे महापालिकेने म्हटले आहे.