19 January 2021

News Flash

“सीबीआयने अजूनही सांगितलं नाही, सुशांतची हत्या की आत्महत्या?”; देशमुख यांचा सवाल

सीबीआयकडे तपास देऊन पाच महिने लोटले

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख व मयत अभिनेता सुशांत सिंह राजपूत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा मुद्दा राज्यात प्रचंड गाजला होता. या मुद्यावरून अनेक राजकीय वादविवाद बघायला मिळाले. त्याचबरोबर सुशांतची हत्या झाल्याचा आरोपही करण्यात आला. नंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आली होती. मात्र, सीबीआयकडून यावर कोणतही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सवाल उपस्थित केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने गळफास घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र उलटसुलट चर्चांचे पेव फुटले होते. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर हत्या असल्याचंही म्हटलं होतं. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचं गुढ उलगडलेलं नाही.

सीबीआयच्या तपासाबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे. “सीबीआयने तपास सुरू करून आता जवळपास पाच महिने झाले आहेत. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर राजकीय आणि बॉलिवूडमध्ये शाब्दिक युद्धच पेटलं होतं. अभिनेत्री कंगना रणौतसह भाजपा नेत्यांनी राज्य सरकारवर हल्ले चढवले होते. विशेषतः कंगनानं सुशांतची हत्या करण्यात आल्याचा पुर्नरुच्चार वारंवार केला होता. बिहार विधानसभा निवडणुकीतही सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा मुद्दा चर्चेत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 1:36 pm

Web Title: sushant singh rajput death case maharashtra home minister raise questions about cbi inquiry bmh 90
Next Stories
1 ‘एमआयएम’ने वळवला गुजरातकडे मोर्चा; आगामी निवडणुकांसाठी ‘या’ पक्षाशी केली हातमिळवणी
2 ‘या’ राज्यात जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई
3 नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा; पंतप्रधान मोदी यांचं देशवासीयांना आवाहन
Just Now!
X