News Flash

सुशांतच्या आत्महत्येवर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातून शोक व्यक्त; उपसंचालक म्हणाले…

गिलाद कोहेन यांनी ट्विटरच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या करत त्याचं जीवन संपवलं. नैराश्य आल्यामुळे सुशांतने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे कलाविश्वासह संपूर्ण देशभरातून त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. उत्तम अभिनय आणि मनमिळाऊ स्वभावामुळे सुशांतने अनेकांची मनं जिंकली होती. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही अफाट होता. विशेष म्हणजे सुशांतची लोकप्रियता केवळ देशापुरती मर्यादित नसून विदेशातही तो लोकप्रिय होता. त्यामुळे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील उपसंचालकांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील उपसंचालकांनी गिलाद कोहेन यांनी मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. “सुशांत सिंह राजपूतचं निधन झालं याचं मनापासून वाईट वाटतंय. तो इस्रायलचा खरा मित्र होता. तुझी फार आठवण येईल. तो जेव्हा इस्रायलला आला होता, तेव्हा असं काहीसं झालं होतं’, असं ट्विट करत गिलाद कोहेन यांनी सुशांतच्या ‘ड्राइव्ह’ चित्रपटातील एक गाण्याची लिंक शेअर केली आहे.

दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचं परदेशात चित्रीकरण होतं. त्यातला ‘ड्राइव्ह’ हा चित्रपट होता. यातील एक गाणं अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि सुशांतवर चित्रीत करण्यात आलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 2:23 pm

Web Title: sushant singh rajput death israel tribute gilad cohen deputy director general twitter ssj 93
Next Stories
1 “परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाही”, सुप्रीम कोर्टाकडून रथयात्रेला स्थगिती
2 ‘करोना कवच’ ऑफर… साडीबरोबर मिळणार मॅचिंग मास्क, सॅनिटायझर, काढा पावडर आणि औषधं
3 “लॉकडाउन संपल्यानंतर…”, लडाखमधील शहीद जवानाने कुटुंबाला दिलेला ‘तो’ शब्द अखेरचा ठरला
Just Now!
X