News Flash

‘आत्महत्येबाबत आमच्यात झाली होती चर्चा’; सुशांतच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

पहिल्याच भेटीत सुशांत आणि तिच्यात आत्महत्येविषयी चर्चा झाल्याचं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय.

Sushant Singh Rajput
सुशांत सिंह राजपूत

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर दररोज नवनवीन बाब समोर येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्यात होता असं म्हटलं जात आहे. सुशांतची मैत्रीण आणि मॉडेल आयशा कपूर अदलखा हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित एक धक्कादायक खुलासा केला आहे. पहिल्याच भेटीत सुशांत आणि तिच्यात आत्महत्येविषयी चर्चा झाल्याचं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय.

आयशाने लिहिलं, ‘मी पहिल्यांदा सुशांतला त्याच्या वांद्रे इथल्या घरी भेटले होते. त्यावेळी आम्ही आत्महत्येवर चर्चा केली होती. मला आठवतंय, आम्ही दोघं त्याच्या घराच्या बाल्कनीमध्ये उभे होतो आणि तेव्हा म्हणाला की, इथून उडी मारली तर कसं वाटेल? आम्ही इतरही मुद्द्यावर चर्चा केली. सुशांतच्या नवनवीन गोष्टींबद्दल जाणून घेण्याची फार उत्सुकता होती. आतापर्यंत मी भेटलेल्या सेलिब्रिटींपेक्षा तो खूप वेगळा होता. त्यावेळी त्याच्या डोक्यात काय चालू होतं हे मला माहित नाही. पण स्थिर व्यक्तीसुद्धा मानसिररित्या इतका कमकुवत असू शकतो हे समजलं.’

आणखी वाचा : सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला..

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक जणांचा जबाब नोंदविला आहे. यामध्ये सुशांतचे कर्मचारी, मॅनेजर, घरकाम करणारी महिला, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 2:30 pm

Web Title: sushant singh rajput death vj ayesha adlakha reveals they discussed suicide ssv 92
Next Stories
1 सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला..
2 Father’s day 2020 : ‘बाप तो बाप होता हैं’; प्रविण तरडेंकडून वडिलांना खास शुभेच्छा
3 ‘बिग बॉस मराठी’ फेम शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा; ३५ जणांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
Just Now!
X