News Flash

गुंजा सा है कोई इकतारा! चाहतीने ताऱ्याला दिलं सुशांतचं नाव

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सुशांत सिंह राजपूत

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आकाश, चंद्र, तारे, ग्रह यांचं निरीक्षण करायची, त्यांचा अभ्यास करायची फार आवड होती. त्याची हीच आवड ओळखत एका चाहत्याने ताऱ्याला सुशांतचं नाव दिलंय. सोशल मीडियावर यासंदर्भातील चाहत्याचं ट्विट व्हायरल होत आहे.

“सुशांतला ताऱ्यांविषयी नेहमीच कुतूहल होतं, आवड होती. म्हणून मी एका ताऱ्यालाच त्याचं नाव दिलंय. तू आता त्या ताऱ्यासारखाच नेहमीच चमकत राहशील सुशांत”, असं भावनिक ट्विट त्या चाहत्याने केलंय. यासोबतच चाहत्याने प्रमाणपत्राचा फोटोदेखील पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : चेहऱ्यावर कधी आसू कधी हसू आणणारी सुशांतची शेवटची भूमिका 

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या मृत्यूनंतर इतक्या दिवसांनीही सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित जुने फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्याच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘दिल बेचारा’ हा सुशांतचा शेवटचा चित्रपट असून येत्या २४ जुलै रोजी तो हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 7:25 pm

Web Title: sushant singh rajput fan names a star after actor ssv 92
Next Stories
1 विराट-हार्दिक पुश-अप्सवर चॅलेंज: पाहा नताशाची रोमँटिक कमेंट
2 ‘ब्रीद’च्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चनसोबत दिसणार हृषिकेश जोशी
3 अक्षय विसरला होता ट्विंकलचा वाढदिवस, अचानक द्यावे लागले होते ‘हे’ गिफ्ट
Just Now!
X