News Flash

सुशांतच्या आत्महत्येनंतर १२ दिवसांनी वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

सुशांतच्या निधनानंतर १२ दिवसात काय झालं? सुशांतच्या वडिलांनी व्यक्त केल्या भावना

प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी घटना १४ जून रोजी घडली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या कलाकाराच्या निधनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. यातील अनेक प्रश्न हे कलाविश्वातील घराणेशाहीकडे झुकणारे असल्याचं दिसून आलं. सुशांतचा मृत्यु झाल्यानंतर १२ दिवसांनी त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका वेबसाईटशी बोलत असताना सुशांतच्या मृत्युनंतर या १२ दिवसांमध्ये काय काय घडलं हे त्यांनी सांगितलं.

सुशांतच्या आत्महत्येमुळे कलाविश्वातील अनेकांना धक्का बसला असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा श्रद्धांजली वाहिली. मात्र या काळात अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अंकिता लोखंडे या दोन अभिनेत्री सोडल्या तर अन्य कोणत्याही कलाकाराने सुशांतच्या कुटुंबीयांची चौकशी केली नाही, असं त्याच्या वडिलांनी ‘बॉलिवूड तडका’शी बोलताना सांगितलं.

“सुशांतच्या अत्यंसंस्काराच्या वेळी कलाविश्वातील बरेच कलाकार आहे होते. मात्र त्यापैकी कोणीच माझ्याजवळ येऊन माझी विचारपूस केली नाही. मी तीन दिवस मुंबईत होतो. मात्र या काळात अंकिता लोखंडेव्यतिरिक्त अन्य कोणताच कलाकार आम्हाला भेटायला नाही आला. तसंच बॉलिवूडमधील क्रिती सेनॉनही आमच्याशी बोलायला आली होती”, असं ते म्हणाले.

सुशांतचे वडील पुढे म्हणतात, “सुशांतच्या जाण्यानंतर क्रिती सेनॉनने आमची भेट घेतली. त्यावेळी आम्ही कोणीच काहीच बोलत नव्हतो. ती फक्त बोलत होती. तिचं म्हणणं आम्ही शांतपणे ऐकत होतो. क्रिती घरी आल्यावर आमच्या बाजूला बसली,पण ती कोण आहे हे आम्हाला समजलं नाही. मग कोणी तरी सांगितलं की ती क्रिती सेनॉन आहे. पण ती खरंच क्रिती होती की अन्य कोण हेदेखील आम्हाला माहित नाही. पण ती हुशार होती, सुशांत एक चांगला मुलगा होता वगैरे असं बोलत होती”.

दरम्यान, सुशांतच्या वडिलांच्या या प्रतिक्रियेनंतर अनेकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं आहे. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या केली. नैराश्य आल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या अंत्यसंस्कारावेळी रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर, वरुण धर्मा, विवेक ओबेरॉय, क्रिती सेनॉन हे कलाकार उपस्थित असल्याचं म्हटलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 10:25 am

Web Title: sushant singh rajput father reveals kriti sanon was the only star who spoke to him ssj 93
Next Stories
1 टिकटॉक स्टार सिया कक्कडला मिळत होत्या धमक्या; कुटुंबीयांचा खुलासा
2 सुशांतच्या Social Media Account वर पोलिसांना शंका; मागवली मागील सहा महिन्यांची माहिती
3 कलाकार-तंत्रज्ञांना विमा संरक्षण
Just Now!
X