News Flash

‘त्याच्या जन्मासाठी केला होता नवस, पण…’; सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया

अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सुशांत त्याच्या वडिलांना न सांगता मुंबईत आला होता.

सुशांत सिंह राजपूत व त्याचे वडील के. के. सिंह

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. १४ जून रोजी त्याने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या कलाकाराच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. सुशांतचा मृत्यूनंतर १२ दिवसांनी त्याचा वडिलांनी प्रतिक्रिया दिली. “सुशांत खूप खास मुलगा होता. ३४ वर्षांत त्याने खूप यश संपादन केलं”,  असं त्याचे वडील के. के. सिंह म्हणाले.

“अनेक प्रार्थना केल्यानंतर सुशांतचा जन्म झाला होता. मन्नत से जो मांगा जाता है, वो ऐसा ही होता है (नवस करून जे मागितलं जातं ते असंच असतं.) तो विशेष आत्मा होता. काही वर्षांतच त्याने खूप काही कमावलं होतं. एवढं यश संपादन करण्यासाठी लोकांचं अख्खं आयुष्य निघून जातं”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सुशांत त्याच्या वडिलांना न सांगता मुंबईत आला होता. याविषयी ते पुढे म्हणाले, “मला न सांगताच तो मुंबईला निघून गेला. मोठी बहीण नीतूला त्याने सगळं काही सांगितलं होतं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईला होता. त्याला शिक्षण पूर्ण करण्यास सांगेन म्हणून तो मला सांगायला घाबरला होता. पण त्यानंतर लगेच त्याला मालिकेत काम करण्याची ऑफर मिळाली होती.”

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुशांतने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. करिअर सुरळीत चालू असताना सुशांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 6:39 pm

Web Title: sushant singh rajput father said my son was a special soul he was born after so many prayers ssv 92
Next Stories
1 नयनताराला मागे टाकत ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन?
2 स्वरा भास्करच्या ‘रसभरी’ वेब सीरिजवरून भन्नाट मीम्स व्हायरल
3 फोटोतल्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? होती सुशांतची जवळची मैत्रीण
Just Now!
X