News Flash

सुशांतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जाहीर

डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची वेळ आता जाहीर झाली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची वेळ आता जाहीर झाली आहे. २४ जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे.

जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र लॉकडाउनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.

किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेमकहाणी नाही. यात बरेच ट्विस्ट आहेत. संजनाचा हा पहिलाच चित्रपट असला तरी ट्रेलरमध्ये तिच्या दमदार अभिनयाची छाप पाहायला मिळते. “जन्म आणि मरण आपल्या हातात नाही पण कसं जगायचं हे आपल्या हातात आहे”, हा सुशांतचा संवाद मनाला भिडतो.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 6:35 pm

Web Title: sushant singh rajput final film dil bechara to premiere on disney plus hotstar at this time ssv 92
Next Stories
1 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’च्या कलाकारांसाठी नवे आव्हान!
2 Video : “दिल बेचारा” म्यूझिक ट्रॅक व्हिडीओद्वारे ए आर रहमानने वाहिली सुशांतला श्रद्धांजली
3 सलमान खान करतोय ‘वर्क फ्रॉम होम’; ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यास दिला नकार
Just Now!
X