News Flash

सुशांतच्या आत्महत्येनंतर इन्स्टाग्रामवर वाढले तब्बल इतके लाख फॉलोअर्स

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर त्याचे जुने फोटो, व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागले आहेत.

सुशांत सिंह राजपूत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर त्याचे जुने फोटो, व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागले आहेत. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या वांदे इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सुशांतच्या फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्राम अकाऊंटकडे नेटकऱ्यांचं सर्वाधिक लक्ष गेलं. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ९० लाख फॉलोअर्सवरून आता ते १ कोटी अठरा लाख इतके झाले आहेत. गेल्या काही दिवसांत सुशांतच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये २० लाखांची वाढ झाली आहे.

सुशांतने त्याच्या आईचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता आणि हीच त्याची अखेरची पोस्ट ठरली. त्याच्या आत्महत्येची माहिती समजल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. परंतु त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याच्या निधनानंतर त्याची ही अखेरची पोस्ट चर्चेत आली होती.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत सिंह राजपूत घराघरात पोहोचला होता. छोट्या पडदा गाजवल्यानंतर या अभिनेत्याने त्याचा मोर्चा बॉलिवूडकडे वळविला होता. ‘काइ पो चे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘एम.एस. धोनी’, ‘केदारनाथ’,छिछोरे’ , ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 4:06 pm

Web Title: sushant singh rajput gains over 2 million followers on instagram after his demise ssv 92
Next Stories
1 ‘लहान मुलीला पुरुषांसमोर उत्तेजक डान्स करताना दाखवणं कितपत योग्य?’; ‘रसभरी’ वेब सीरिजवरून प्रसून जोशींचा सवाल
2 ‘मला वाटलं मी करोनामुक्त झालो,पण….’; गायक मिलिंद इंगळेंनी सांगितला करोनाचा अनुभव
3 ‘हाच आमच्यात आणि स्टारकिडमध्ये फरक आहे’; घराणेशाहीवर हिना खान व्यक्त
Just Now!
X