06 August 2020

News Flash

सुशांतच्या चाहत्यांची अनोखी श्रद्धांजली; रस्त्याला व चौकाला दिलं सुशांतचं नाव

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित केली सीबीआय चौकशीची मागणी

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला चाहते अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली देत आहेत. बिहारच्या पूर्णियामधील रस्त्याला व चौकाला सुशांतचं नाव देण्यात आलं आहे. महापौर सविता सिंह यांनी नगरपालिकेकडून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आणि फोर्ड कंपनी चौकाचं नाव बदलून सुशांत सिंह राजपूत चौक नाव देण्यात आलं. तर मधुबनी चौकातून माता चौककडे जाणाऱ्या रस्त्याला सुशांत सिंह राजपूत पथ असं नाव देण्यात आलं आहे.

चौक व रस्त्याला सुशांतचं नाव दिल्यानंतर त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतकंच नव्हे तर सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सविता सिंह यांनी बिहार आणि भारत सरकारला पत्र लिहित सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं, “मला भारत आणि बिहार सरकारवर पूर्ण विश्वास आहे की सरकार सीबीआय चौकशीची परवानगी नक्की देईल.”

आणखी वाचा :  ‘डिअर जिंदगी’ आलियाला मिळावा यासाठी करण जोहरने लावली होती सेटिंग? 

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. अभिनेते शेखर सुमन व अभिनेत्री रुपा गांगुली यांनीसुद्धा सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 3:58 pm

Web Title: sushant singh rajput gets a road named after him in his hometown purnea in bihar ssv 92
Next Stories
1 रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण; बंगला केला सील
2 ‘त्या’ वादानंतर स्टँडअप कॉमेडियनने मागितली माफी; हटवला वादग्रस्त व्हिडीओ
3 ‘डिअर जिंदगी’ आलियाला मिळावा यासाठी करण जोहरने लावली होती सेटिंग?
Just Now!
X