News Flash

आदित्य रॉय कपूरला धडा शिकवण्यासाठी ‘रिया’ने शूट केला होता किसिंग सीन?

दोन वर्षे रिया आणि आदित्य एकमेंकाना डेट करत होते.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनंतर सुशांतची मैत्रीण म्हणणारी स्मिता पारिखने रिया संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतआधी रिया अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत होती. दोन वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, स्मिताने रियावर गंभीर आरोप केले आहेत. रियाला मुद्दाम सुशांतच्या आयुष्यात आणले गेले होते. त्यापूर्वी ती २०१२ ते २०१४ पर्यंत अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण त्यांचा ब्रेकअप झाला. आजवर त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही असे स्मिता म्हणाली आहे. रियाने तिचा चित्रपट ‘सोनाली केबल’मध्ये अली फजलसोबत किसिंग सीन देण्यास नकार दिला असल्याचे म्हटले जाते. पण जेव्हा आदित्यने ‘आशिकी २’मध्ये श्रद्धा कपूरसोबत किसिंग सीन दिला तेव्हा तिने आदित्यला धडा शिकवण्यासाठी अली फजलसोबत किसिंग सीन शूट केला होता.

आणखी वाचा : महिलेने तोंडाऐवजी केसाला लावले मास्क, अभिनेत्रीने शेअर केला फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

रिया आणि आदित्यचं ब्रेकअप झाल्यानंतरही आदित्य रियावर प्रचंड प्रेम करत होता असे म्हटले जाते. सुशांतच्या मृत्यूनंतर सुरु असलेल्या तपासात रियाच्या फोनचा संपूर्ण डेटा समोर आला होता. त्यामध्ये आदित्यने रियाला फोन केल्याचे समोर आले होते. पण त्यांच्यामध्ये केवळ मैत्रीचे नाते असल्याचे म्हटले जाते.

रिया चक्रवर्तीने ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘सोनली केबल’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण ‘जलेबी’ या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. आता ती लवकरच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘चेहरे’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 9:58 am

Web Title: sushant singh rajput gf rhea chakraborty revenge aditya roy kapur with kissing scene avb 95
Next Stories
1 जॅकीदादाचा ‘अतिरिक्त’ झुम्बा पाहून अनिल कपूर म्हणतो, “हे तू….. “
2 “मास्क घाला रे”; वरुण धवनने चाहत्यांसमोर जोडले हात
3 बिकिनी घातल्याने इमरान खान यांच्या बायोपिकमधील मुख्य अभिनेत्री ट्रोल
Just Now!
X