अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सध्या या घटनेला वेगळ वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच पोलीस तपासात रोज नवनवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. यामध्येच आता मृत्यूपूर्वी सुशांतने त्याच्या नवाव्यतिरिक्त अन्य कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च केल्या होत्या हे समोर आलं आहे. विशेष म्हणजे सुशांतने अनेक धक्कादायक गोष्टी सर्च केल्याचं सांगण्यात येत आहे.
सुशांतने मृत्यूपूर्वी कोणत्या गोष्टी सर्च केल्या याविषयीची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली आहे. सुशांतने त्याच्या नावाव्यतिरिक्त स्किझोफ्रेनिया (Schizophrenia), बायपोलर डिसऑर्डर (Bipolar disorder), पेनलेस डेथ अशा गोष्टी सर्च केल्या होत्या.

“सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १५ जून रोजी फॉरेन्सिक टीम आणि डॉक्टर्स सुशांतच्या घरी पोहोचले आणि त्यांनी घराला डी-सील केलं. सुशांतचं नाव दिशा सालियनप्रकरणाशी जोडलं गेलं तेव्हा तो नैराश्यात गेला होता”, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…
Nifty hit a high of 22297 points eco news
निफ्टीची २२,२९७ अंशांची उच्चांकी दौड
vadhavan port in national interest
‘वाढवण’साठी लोकांशी स्वच्छ संवाद हवा

पुढे ते म्हणतात, “सुशांत आणि दिशा केवळ एकदाच भेटले होते. तसंच त्याने दिशाच्या वकिलांना मेसेज करुन या प्रकरणात माझं नाव का गोवण्यात येतंय असा प्रश्नही विचारला होता. सुशांतची गुगल हिस्ट्री चेक केल्यानंतर त्यात स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, पेनलेस डेथ अशा गोष्टी सर्च केल्याचं पाहायला मिळालं”.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरणं सध्या चांगलंच चर्चिलं जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आता चाहते आणि कलाविश्वातील काही सेलिब्रिटींकडून होऊ लागली आहे.