अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. त्याच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण होतं, याचा तपास मुंबई पोलीस घेत आहेत. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतने आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले होते. पगार देताना त्याने कर्मचाऱ्यांना असंही म्हटलं होतं की, त्याला यापुढे पैसे देणं शक्य होणार नाही.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांचा जबाब नोंदवला आहे. एका वेब सीरिजमधील भूमिकेसंदर्भात सुशांत दिशा सालियनसोबत चर्चा करत होता अशी माहिती त्याच्या एका मॅनेजरने पोलिसांना दिली. दिशा सालियन ही आधी सुशांतकडेच मॅनेजर म्हणून काम करायची. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच तिनेसुद्धा आत्महत्या केली होती. मात्र या दोघांच्या चर्चेबाबत अद्याप ठोस काही माहिती मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!

सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट अद्याप प्रेक्षकांच्या भेटीला यायचा आहे. हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करावा अशी जोरदार मागणी त्याच्या चाहत्यांकडून होत आहे. ‘छिछोरे’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘काइ पो चे’, ‘केदारनाथ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीबाबत सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे.