यशाच्या शिखरावर असताना अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आयुष्य संपवण्याचा निर्णय त्याने का घेतला असेल? याचीच चर्चा सध्या सुरू आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वाला हादरवून सोडले आहे. असं असतानाच आता सुशांत मानसिक तणावामध्ये होता त्यामधून त्याचे अगदी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘छिछोरे’ चित्रपटात नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाच्या वडिलांची भूमिका त्याने साकारली. निराशा, अपयश यामुळे आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय चुकीचा आहे हा संदेश चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुशांतनेच आपले आयुष्य त्या मार्गाने संपवले ही त्याच्या चाहत्यांसाठी अनाकलनीय गोष्ट आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर केले जात आहेत. त्यामध्ये एक फोटो खास लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूत, महिन्याभरापूर्वी निधन झालेला अभिनेता इरफान खान, आणि बॅटमॅन सिरीजमध्ये जोकरची भूमिका साकारणाऱ्या हिथ लेजर या तिघांच्या मृत्यूनंतर तिघांमधील एक विचित्र योगायोग दाखवणारा हा फोटो आहे. या तिन्ही अभिनेत्यांचे मोठ्या पडद्यावरील शेवटचे सीन जवळजवळ सारखेच होते असा दावा या व्हायरल फोटोमध्ये करण्यात आला आहे.

काय आहे या फोटोमध्ये 

जोकर ही मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा साकारणारे सर्वच अभिनेत्यांना काही ना काही मानसिक त्रास झाल्याचे दिसून येते. असं असतानाच २००८ साली जोकरची भूमिका साकारणाऱ्या हिथ लेजरने आत्महत्या केली. मात्र या चित्रपटामधील शेवटच्या दृष्यामध्ये हिथ लेजर हा गाडीच्या खिडकीमधून डोकं बाहेर काढून हसताना दिसत आहे.

नक्की वाचा >> ट्विटरवरील कव्हर फोटो आणि सुशांतच्या मृत्यूचं कनेक्शन?; आत्महत्येनंतर चर्चेत आलं ‘ते’ चित्र

अशाच प्रकारे अभिनेता इरफान खानचे २९ एप्रिल रोजी मुंबईमध्ये निधन झालं. कोलोन इन्फेक्शनमुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. कॅन्सर सारख्या आजारावर मात करुन इरफान खानने अंग्रेजी मीडियम या सिनेमाचं शुटींग पूर्ण केलं होतं. त्याच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला होता. या चित्रपटामध्ये मुलीच्या बापाची भूमिका बजावणारा इरफान चित्रपटाच्या शेवटच्या काही दृष्यांपैकी एक दृष्यामध्ये गाडीच्या खिडकीच्या बाहेर डोकं काढून हसताना दिसत होता. इरफानची ही मोठ्या पडद्यावरील शेवटची झकल ठरली.

रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या सुशांतचा मोठ्या पडद्यावरील शेवटचा चित्रपट ठरला तो ‘छिछोरे’. या चित्रपटामध्येही सुशांत शेवटच्या काही दृष्यांमध्ये गाडीच्या खिडकीमधून बाहेर बघत हसताना दिसला होता. आत्महत्या करणं हा पर्याय नाही असा संदेश देणाऱ्या या चित्रपटामध्ये सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. दुर्देवाने त्यानेच आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं.

नक्की वाचा >>“सुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाइलमध्ये असतील तर…”; महाराष्ट्र पोलिसांचा इशारा

आता या तिघांच्याही या शेवटच्या ऑन स्क्रीन प्रेझेन्सचा कोलाज फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ट्विटवर अनेकांनी हा फोटो ‘निव्वळ योगायोग’ असं म्हणत ‘शेवटचा चित्रपट आणि शेवटचं हास्य’ या कॅप्शनसहीत शेअर केला आहे.

सुशांतच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस येथे असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.