07 August 2020

News Flash

सुशांतची अखेरची आठवण; ‘दिल बेचारा’चं नवीन पोस्टर प्रदर्शित

पाहा, सुशांतच्या 'दिल बेचारा'चं नवीन पोस्टर

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या करुन त्याचं जीवन संपवलं. ही घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सुशांतने हा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. यातच सुशांतची शेवटची आठवण म्हणून त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे त्याचं हे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं आहे. तसंच या चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.

लॉकडाउनचा काळ असल्यामुळे या काळात अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. यात सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट देखील डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी त्याचं प्रदर्शित झालेल नवीन पोस्टर चित्रपट दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी शेअर करत ”तुझ्या प्रेमाखातर”, असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री संजना सांघीनेदेखील हे पोस्टर शेअर करत,” मैनीशिवाय किजी पूर्णपणे अपूर्ण आहे. हा माझा सगळ्यात आवडता सीन होता”, असं म्हटलं आहे. मुकेब छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात सुशांत मुख्य भूमिकेत होता. तर अभिनेत्री संजना सांघी ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटाच्या निमित्ताने कलाविश्वात पदार्पण करणार आहे. तसंच अभिनेता सैफ अली खानदेखील या चित्रपटात कॅमिओ मध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 3:57 pm

Web Title: sushant singh rajput last film dil bechara trailer will release tomorrow ssj 93
Next Stories
1 Video : तरुणांनाही लाजवेल असा उत्साह; मिलिंद सोमणच्या आईने असा साजरा केला वाढदिवस
2 ‘शाहिद खरा चॉकलेट बॉय नाही’; मीरा राजपूतचं अजब वक्तव्य
3 ‘सर्किट’लाही वाढीव वीजबिलाचा शॉक! निवडला ‘हा’ मार्ग
Just Now!
X