बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू झाला. याची माहिती ‘फुकरे’ अभिनेता वरुण शर्माने सोशल मीडियाद्वारे दिली. आता सुशांत सिंह राजपूतने दिशाच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
दिशा सध्या वरुण शर्मासाठी काम करत होती. त्यापूर्वी तिने सुशांत सिंहसाठी काम केले होते. आता तिच्या निधनाची बातमी ऐकून सुशांतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्याने या पोस्टद्वारे दिशाला श्रध्दांजली वाहिली आहे.
तसेच वरुण शर्माने देखील इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. मला हे खरं वाटत नाही. खूप आठवणी आहेत. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचे. कामात नेहमी येणाऱ्या अडथळ्यांना ती एकदम सहजपणे सामोरी जायची. तिची खूप आठवण येईल. माझा अजूनही विश्वास बसत नाही की ती आपल्यामध्ये नाही’ असे वरुणने पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारती सिंहने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तिने दिशाचा फोटो शेअर करत त्यावर रडण्याचे इमोजी वापरले आहेत.
दिशा ही पहिले सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. पण ती आता फुकरे चित्रपटातील अभिनेता वरुण शर्मासाठी काम करत होती. तिने आजवर अनेक सेलिब्रिटींसाठी काम केले आहे. या सेलिब्रिटींमध्ये भारती सिंह आणि ऐश्वर्या राय बच्चनचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 12:19 pm